शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

‘मार्केर्टिंग’ साठी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचा होतोय प्रभावी वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:00 AM

व्हिजिटींग कार्ड वाटण्याचे काम देखील काही लहान मुलांना दिले जात आहे. त्यांना खाऊ पिऊ घालुन किंवा खिशात शंभर दोनशेची नोट टाकुन मोठ्य खुबीने त्यांचा उपयोग करुन घेतला जात आहे.

ठळक मुद्दे जंगली महाराज रस्ता, डेक्कन बस स्टॉप, एफसी रस्ता रस्त्यांवर भिकाऱ्यांचा खास करुन उपयोग

युगंधर ताजणे  पुणे :  जिथे दोनवेळच्या भाकरीची भ्रांत अशावेळी कुणी हातावर शंभर किंवा दोनशे रुपयांची नोट ठेवली तर आनंदाने तो सांगेल ते काम केले जाते. न बोलणा-याचे सोनेही विकले जात नाही तर दुसरीकडे बोलणा-याची मातीही विकली जाते. या उक्तीनुसार सध्याच्या  ‘‘मार्केटींग’’ च्या जमान्यात प्रत्येकाचा निभाव लागणे कठीण काम आहे. आता तर आपल्या एखाद्या वस्तुची, उत्पादनाची इतकेच नव्हे तर नव्याने सुरुवात करत असलेल्या कंपनीच्या  ‘‘जाहिराती’’ करिता रस्त्यावरील भिकाऱ्यांचा आधार घेतला जात आहे. प्रस्थापित समाज आणि बदलत्या विकासाच्या प्रवाहापासून ब-याच अंतरावर उभ्या असलेल्या गरीबांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो. रस्त्यावर भीक मागणे, एखाद्या सणवाराच्या वेळी खासकरुन दिवाळी, नाताळ, स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी हातात झेंडे घेऊन सिग्नलवर चारचाकी गाडीच्या खिडक्यांवर ती लहान मुले लक्ष वेधुन घेतात. मोठ्या व्यक्ती गजरे, टिश्यु पेपर, फुगे, अंकलिपी, खेळणी या वस्तु विकण्याकरिता गाडीच्या मागे पुढे करताना दिसतात. दिवसभरातून मोजकीच कमाई हाती येणा-या या व्यक्तींपुढे रात्री जेवणाचा प्रश्न निर्माण होतो. यासगळ्यात त्या लहान मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्या या परिस्थितीचा उपयोग विविध कंपन्यांच्या मार्केटींगमधील व्यक्तींनी करुन घेतल्याचे पाहवयास मिळत आहे. जंगली महाराज रस्ता, डेक्कन बस स्टॉप, एफसी रस्ता, प्रभात, बाजीराव रस्त्यांवरील भिकाऱ्यांचा खास करुन लहान मुलांचा आपल्या उत्पादनांची, वस्तुंची जाहीरात करण्याकरिता उपयोग करुन घेतला जात आहे. यात काही वेळा उत्पादनाविषयी माहिती देणा-या पँम्पलेटस वाटणे, तर कधी पोस्टर्स चिटकवणे यासारखी कामे त्यांच्याकडून करुन घेतली जात आहे.   इतकेच नव्हे व्हिजिटींग कार्ड वाटण्याचे काम देखील काही लहान मुलांना दिले जात आहे. त्यांना खाऊ पिऊ घालुन किंवा खिशात शंभर दोनशेची नोट टाकुन मोठ्य खुबीने त्यांचा उपयोग करुन घेतला जात आहे. बाजारात पँम्पलेट वाटणे, भित्तीपत्रके चिटकविणे, व्हिजिटींग कार्ड किंवा उत्पादनविषयक माहितीपत्रके वाटणा-यांचे  ‘‘फिक्स रेट’’ ठरले असताना दुसरीकडे या रस्त्यावरील भिक्षुकांकडून स्वस्तात काम करुन घेतले जात आहे. 

* पैसा मिळाला हे  महत्वाचे डेक्क्नच्या पुलावर भीक मागणा-या रतनला याविषयी विचारले असता तो म्हणाला, नाही तरी दिवसभर फारसे काम असते कुठे? तेव्हा एकवेळ कमी पैसे जरी मिळाले तरी जेवणाचा प्रश्न सुटतो. आपण एकटे नसतो आपल्याबरोबर रस्त्यावर झोपणारे कुटूंब देखील आहे. त्यांनाही खाऊ घालावे लागते. हे खरे की, कमी पैशांत जास्त काम करुन घेतले जाते. पण मी त्या कामाला नाही म्हटलो तर दुसरा कुणी ते करण्याकरिता उभा राहतो. अशावेळी शांतपणे जीवावर येते. 

*  मार्केटींगचा वेगळा फंडा ...बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, एखाद्या प्रसंगी चहाच्या टपरीवर लहान मुलांच्या हातात हमखास वेगवेगळ्या रंगाची, आकाराची माहितीपत्रके दिसतात. ते ती वाटतात किंवा भिंतीवर चिटकवतात. दिसेल त्याच्या हातात ते माहितीपत्रक देतात. त्यांच्या खिशात व्हिजिटींग कार्डचा गठ्ठा असतो. चहा पिण्याकरिता आलेल्या व्यक्तींना ती वाटली जातात. एकीकडे शहरातील अनेक सामाजिक संस्था भिक्षुक मुलांचे जीवनमान सुधारण्याकरिता प्रयत्नशील असताना दुस-या बाजुला कमी मोबदला देऊन त्यांच्याकडून ‘‘मार्केटींग’’ चे काम करुन घेतले जाते. 

टॅग्स :PuneपुणेMarketबाजारAdvertisingजाहिरात