पानशेतजवळील एका गावात अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार करुन खून केला होता. त्या मुलीच्या पीडित कुटुंबीयांची रुपाली चाकणकर यांनी भेट घेतली. या वेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस वेल्हे तालुक्याचे प्रमोद लोहकरे, उपसरपंच आशा अंकुश पासलकर, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष विकी भालेराव, सरचिटणीस महेश धिवार, राहुल ठाकर, किर्ती देशमुख, सारिका रानवडे, योगिता तोडकर, शुभांगी खिरिड, ममता फाळके, शुभांगी हाळंदे, वसंत चरेकर, अविनाश ठाकर उपस्थित होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, आदिवासी कातकरी समाजातील नागरीकांसाठी शासकीय योजना असूनही केवळ अपुऱ्या कागदपत्रांमुळे त्यांना त्याचा फायदा मिळत नाही. आदिवासी कातकरी समाज कष्टकरी समाज आहे. त्यांच्याकडे जातीचा पुरावा नसल्याने त्यांना कोणताही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांची मुलेही शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहतात. जातीचे दाखले त्यांना वस्तीवर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.