रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:24 PM2018-08-16T23:24:55+5:302018-08-17T00:22:17+5:30
जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेचे राज्य शासनाकडे असलेले थकीत विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल
पुणे - जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेचे राज्य शासनाकडे असलेले थकीत विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी योग्य प्रस्ताव देण्यात यावेत, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना व अधिका-यांना केल्या.
जिल्हा परिषद कार्यालयाला गुरुवारी अजित पवार यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी पदाधिकारी आणि अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी आणि पशुसंवर्धनच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी विभागवार माहिती घेतली.
जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाºया वैयक्तिक लाभ योजनेची माहिती घेत याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत कर्मचाºयांची कमी असणारी संख्या तसेच निधीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी या विषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेत नव्याने सुरु करण्यात आलेल्या सेवा हक्क कायद्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी
अजित पवार यांना विभागवार माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची भाड्यापोटी असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेली थकबाकी तसेच पाटबंधारे विभागाकडे असलेली ३६ कोटींची थकबाकीबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी पदाधिकाºयांनी पवार यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी योग्य प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पवार यांनी पदाधिकाºयांना दिल्या.