महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राने बनविलेल्या द्राक्ष खरड छाटणी नियमावली प्रकाशनाच्या बारामती येथील कार्यक्रमात ते बोलत होते. मागील तीन वषार्पासून वातावरणातील बदलामुळे किंवा अलीकडे कोरोनामुळे द्राक्ष बागायती पुढील असलेल्या समस्यांबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. द्राक्ष बागायतदारांनी कामगार व्यवस्थापनाकडे अधिकचे लक्ष देऊन खते, कीटकनाशके व बुरशीनाशकांवरील खर्च कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले. कृषी विभागामार्फत द्राक्ष बागायतदारांसाठी वेळोवेळी अभ्यास दौरे आयोजित करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. चालू मार्च महिन्यातच ५० द्राक्ष बागायतदारांच्या अभ्यास दौºयास त्यांनी लगेच मान्यता दिली आहे. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनीही इंधनाचे वाढते दर लक्षात घेता अनावश्यक फवारण्या कमी करून उच्च प्रतीचे उत्पादन घेण्यास सांगितले. द्राक्षे व्यापाºयांबरोबर चर्चा करून देशांतर्गत शहरांमध्ये तसेच विविध देशात लागणाºया प्रतीची द्राक्ष कमी खर्चा मध्ये तयार करण्यासही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास साहेबराव मदने, उमेश घोगरे,किरण पाटील, मच्छिंद्र शिंदे, चंद्रकांत साळुंखे, सतीश देवकाते,संदीप ठेंगल, नितीन केसकर, दीपक देवकाते इत्यादी बागायतदार उपस्थित होते. आभार कृषी अधिकारी दादा काळे यांनी मानले.
महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राने बनविलेल्या द्राक्ष खरड छाटणी नियमावली प्रकाशन करताना उपविभागिय कृषि अधिकारी बालाजी ताटे व इतर
०९०३२०२१-बारामती-०१
--------------------------