ते पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील युवा नेते तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी नवनाथ भगवान वायकर यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या स्व. भगवान ज्ञानोबा वायकर यांच्या स्मरणार्थ पंधराशे शेतकऱ्यांचा सुमारे पंधरा कोटी रुपयांचा अपघाती विमा काढला त्याचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे, प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस प्रदीप कंद, राष्ट्रवादी युवक पुणे शहर शंकर भोरडे, बाळासाहेब भोरडे, शंकर मांडे, भगवान भोरडे, सतीश भोरडे, आतिष ढगे, सोनाली कसुरे, सारिका शिंदे, गंगुबाई वायकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष योगेश शितोळे, सरपंच राजुअण्णा भोरडे, संजय मांडे, साईनाथ वाळके, अमोल भोरडे, निखिल भोरडे, प्रकाश जमादार अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक नवनाथ वायकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रामचंद्र भोरडे यांनी केले.
विमा प्रमाणपत्र वितरण करताना आमदार अशोक पवार, नवनाथ वायकर व इतर मान्यवर.