पुणे : सत्ताधारी पक्षाचे नेते आमचे हात - पाय ताेडण्याच्या धमक्या देत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल हाेत नाहीत. याउलट माझ्यावर जे कलम लागू हाेऊ शकत नाही, असे गंभीर कलम लावून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आराेप आमदारभास्कर जाधव यांनी केला आहे.
शिंदे - फडणवीस सरकारने अनेक प्रकारे दडपशाही सुरू केली आहे. लाेकशाहीतील विराेधकांचे राज्य घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेतले जात आहेत, असेही जाधव म्हणाले. कुडाळ येथील भाषणात चिथावणीखाेर वक्तव्य केल्याच्या आराेपाखाली डेक्कन पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. साेमवारी हजेरी लावण्यासाठी ते पाेलीस ठाण्यात आले हाेते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जाधव म्हणाले की, मी कुडाळ येथे केलेल्या भाषणात काेणत्याही प्रकारच्या कायद्याचा भंग हाेत नसतानाही येथे पुण्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, मी दाेन समाजात तेढ निर्माण हाेईल, असे काेणतेही विधान केलेले नाही, असे माझ्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने मला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आठवड्यातून एकदा येथे येऊन हजेरी लावावी, अशी अट घातल्याने मी न्यायालयाचा सन्मान राखण्यासाठी डेक्कन पाेलीस ठाण्यात हजर झालाे आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि अमित शहा यांचे मन एवढे माेठे नाही, की ते महाराष्ट्राला गुजरातपेक्षा माेठा प्रकल्प देतील. उलट ते महाराष्ट्र आणि तरुणांच्या ताटात वाढले गेलेले प्रकल्प घेऊन गेले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली असती आणि हजाराे तरुणांना राेजगार मिळाला असता, असेही जाधव म्हणाले.
लक्ष विचलित करण्यासाठी कडू-राणा वाद
बच्चू कडू हे मुख्यमंत्री आणि राणा उपमुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत. नागरिकांचे लक्ष विचलित करणे आणि राज्यातील ओला दुष्काळासंदर्भात शेतकऱ्यांनी मदत मागू नये, चांगले प्रकल्प परराज्यात जाताना त्याविराेधात लाेकांनी आवाज उठवू नये, यासाठी या दाेघांची ही केवळ नुरा कुस्ती चालू असल्याचे जाधव यांनी सांगितले.