---
शिक्रापूर : शिक्रापूर ( ता. शिरूर) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध च्या दिशेने जात असताना अनेक मतदार वर्ग मात्र नाराज झाला आहे. निवडणुकीच्या दरम्यान या भागात होणारी आर्थिक उलाढाल मंदावणार असल्याने हॉटेल व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायिकान मधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते . जवळपास पाच हजार ते पंधरा हजार रुपये मताला बाजार भाव मागील निवडणुकीमध्ये पहावयास मिळाला होता. शिरूर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून शिक्रापूर ची ओळख आसून सत्ता मिळवण्यासाठी मोठी चुरस होत असते यातच मोठी आर्थिक उलाढाल बघायला मिळते. जवळपास ६०ते ६५ टक्के मतदार हा कामानिमित्त येऊन स्थायी झाला आहे . दोन किंवा तीन पॅनलच्या या लढाईमध्ये अनेक मतदारांना आर्थिक लाभ पाच वर्षात एकदा मिळतो. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्य असला तरी अनेक मतदार मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. निवडणुकी दरम्यान होणाऱ्या फ्लेक्सबाजी असो अथवा हॉटेल व इतर व्यवसायिक त्याच बरोबर काही मतदार देखील करोना काळातील आर्थिक संकट काहीसे दूर होईल या आशेने ग्रामपंचायत निवडणूकीकडे टक लावून होते. मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साधारणतः पाच ते सहा कोटी रुपयाचा छुपा खर्च झाल्याची चर्चा सध्या शिक्रापूरत जोरदार रंगली असून बिनविरोध निवडणुकीमुळे नेत्यांमध्ये खुशी तर तर अनेक व्यवसायीक व काही मतदारांमध्ये नाराजी दिसत आहे
-----