श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून श्री पांडुरंग विद्या मंदिराचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्रा. संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड,पोलीस पाटील शरद लोखंडे,दिनेश राऊत,श्याम गवारे,घनश्याम गवारे,महादेव पवार,दीपक गवारे आदी युवकांनी श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या घाटावर गणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे आठशे किलो निर्माल्य संकलित करून त्याचे खड्ड्यात टाकून विघटन केले जाणार असल्याचे संदीप गवारी यांनी सांगितले. या वेळी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बेटी बचाव-बेटी पढाव, लेक वाचवा- देश वाचवा, एकदा तू जन्म दे ग- मारू नको मले अशा संदेशाचे फलक विसर्जन घाटावर लावून जनजागृती करण्यात आली.
या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सदिच्छा भेट देऊन पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक केले. मेन चौक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावातील अनेक युवक एकत्रित येऊन गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत आहेत.यावर्षी शिक्रापूर,तळेगाव ढमढेरे परिसरातील वेळ नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे अनेक गणेशभक्तांनी पाच ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीच्या भीमा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी हजेरी लावली होती.विठ्ठलवाडी,तळेगाव ढमढेरे,शिक्रापूर,चंदननगर आदी गावातील व वाड्या-वस्त्यांवरील गणेश मंडळांचे गणपती व घरगुती गणपती मूर्तींचे भीमा नदीच्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व गणेशभक्तांनी नदीच्या पाण्यात निर्माल्य न टाकता निर्माल्य संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे हे निर्माल्य जागेवर आणून दिले व फक्त गणेशमूर्तींचे विसर्जन पाण्यामध्ये करण्यात आले.घाटावरील गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी येथील राबवला जाणारा निर्माल्य संकलनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावर्षी या पर्यावरण उपक्रमाबरोबरच तळेगाव ढमढेरे येथील देवपुरी गणेशोत्सव मंडळाने चार फुटी गणेशमूर्ती भीमा नदीच्या पाण्यात विसर्जित न करता पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी विठ्ठलवाडी येथील श्रीदत्त गणेशोत्सव मंडळाला दान केली.
:शिरूर तालुक्यात श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गावातील युवकांनी राबविलेला निर्माल्य संकलन हा पर्यावरणपूरक असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या सर्व गावांमध्ये येथील युवकांनी मार्गदर्शन केल्यास निर्माल्य संकलन चळवळ उभी करता येईल.
-हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक,शिक्रापूर पोलीस स्टेशन
200921\img_20210920_081708.jpg
?????????? ????? ???????????? ???????? ????? ???????? ????? ????? ????? ??????? ??? ????