संग्राम भाऊसाहेब कापसे, प्रवीण हनुमंत गायकवाड, नवनाथ पांडुरंग बिडगर, संग्राम मुकुंद निंबाळकर, ऋषिकेश सुदाम चव्हाण, सौरभ उत्तम कदम, शुभम धनंजय निंबाळकर, हर्षद राजेंद्र कांगुणे (रा. सर्वजण न्हावरे, ता. शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी स्वप्नील महादेव जाधव यांनी तक्रार दिली आहे. स्वप्नील जाधव याने मंगळवारी (दि. ४) न्हावरे येथील गुंजन टाॅकीजजवळ संग्राम भाऊसाहेब कापसे याला बोलावून तू माझ्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज का पाठविले, असे विचारून तू पुन्हा जर असे मेसेज पाठविले तर मी पोलिसांत तक्रार दाखल करीन असे सांगितले. या वेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. बुधवारी (दि. ५) सकाळी स्वप्नील जाधव सकाळी फिरायला गेला असताना वरील आरोपींनी स्वप्नील जाधव याला गजाने, हाॅकी स्टीकने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याला जातिवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. परत जाताना प्रवीण गायकवाड याने फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन काढून नेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जातिवाचक शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:11 AM