शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

साडेअठरा टीएमसी पाणीवापर गृहीत धरूनच होणार नियोजन ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 1:54 PM

उन्हाळ्यातील बाष्पीभवन ग्राह्य धरल्यास किमान साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध

ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार दरवर्षी १५ ऑक्टोबरअखेरीस धरणात शिल्लक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या आधारे नियोजन शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पाण्याचे नियोजनही या बैठकीत केले जाणार

पुणे : कालवा सल्लागार समितीच्या शनिवारी (दि. २८) होणाऱ्या बैठकीत पुणे शहराचा वार्षिक पाणीवापर १८.५० अब्ज घनफूट (टीएमसी) गृहित धरुनच पाण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे साडेसहा टीएमसी सिंचनासाठी पाणी यंदा उपलब्ध होऊ शकेल. शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पाण्याचे नियोजनही या बैठकीत केले जाणार आहे. दरवर्षी १५ ऑक्टोबरअखेरीस धरणात शिल्लक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या आधारे नियोजन केले जाते. कालवा सल्लागार समितीला आकस्मिक बिगरसिंचन आरक्षण, वापरातील फेरबदल आणि वार्षिक कोटा मंजुरीचे अधिकार नाहीत. त्यांना केवळ सिंचनासाठी शिल्लक राहणाºया पाण्याचे नियोजन करता येते. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या सध्याचा १४०० ते १४५० दशलक्ष लिटर (एमएलडी) दररोजचा पाणीवापर गृहीत धरून जलसंपदातील अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. हा पाणीवापर वार्षिक १८ ते १८.५० टीएमसी गृहीत धरला आहे. सध्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणात मिळून २४.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातून साडेअठरा टीएमसी पाणी वजा केल्यास ६.४३ टीएमसी पाणी शिल्लक राहते. उन्हाळ्यातील बाष्पीभवन ग्राह्य धरल्यास किमान साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. ..........नीरा डाव्या कालव्याबाबतही बैठक

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, त्यास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपलब्ध असतील. सकाळी दहा वाजता बैठक सुरू होईल. सुरुवातीस निरा डावा आणि उजवा कालवा, त्यानंतर चासकमान, भामा-आसखेड आणि पवना धरणाबाबत बैठक होईल. खडकवासलाची बैठक दुपारी साडेबाराच्या सुमारास होणार आहे. त्यानंतर दुपारी अडीच ते चार या वेळेत उजनी धरणातील पाणी नियोजनावर बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जलसंपदातील अधिकाऱ्यांनी दिली. 

 बैठकीत रब्बी आणि उन्हाळी आवर्तनाबाबत चर्चा होईल. त्यातही रब्बी आवर्तनातील नियोजनावर प्राधान्याने चर्चा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका