शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

ससून रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांसाठी एक खिडकी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:52 PM

बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना साहाय्य 

ठळक मुद्देसमुपदेशन, अर्थसाहाय्य व कायदेशीर सल्ला आणि पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजनापुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे मोफत कायदेशीर सल्ला दिला जाणार

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांच्या मदतीसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे.  योजनेमध्ये बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना वैद्यकीय सल्ला, समुपदेशन, अर्थसाहाय्य व कायदेशीर सल्ला आणि पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना कार्यान्वित करणार आहे. ससूनतर्फे एका छत्राखाली स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, बालरोगशल्य चिकित्साशास्त्र, मनोविकारशास्त्र, प्लास्टिक सर्जरी व न्यायवैद्यकशास्त्र या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाईल. पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे मोफत कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे. यासाठी अ‍ॅड. लक्ष्मी वाघमारे, अ‍ॅड. उज्ज्वला थोरात आणि अ‍ॅड. श्रुती डुंबरे या विधिज्ञांची नेमणूक केलेली आहे.  एक खिडकी योजनेचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे साहेब यांच्या हस्ते केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. चंदनवाले म्हणाले, ‘लैंगिक अत्याचार पीडित व्यक्ती साहाय्य घेण्यासाठी पुढे येतील व त्यांना न्याय मिळणे सुलभ होईल. अत्याचार पीडित व्यक्तींचा वेळ वाचेल. वैद्यकीय उपचार, समुपदेशन व कायदेशीर सल्ला ससून सर्वोपचार रुग्णालयातच मिळाल्यामुळे पीडित  व्यक्तीच्या पुनर्वसनात मोलाचा हातभार लागेल.’ या कार्यक्रमाला उपाधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. रमेश भोसले, डॉ. वंदना दुबे, डॉ. आरती किणीकर, डॉ. नितीन अभिवंत, डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव, डॉ,मीनाक्षी भोसले व डॉ. सोमनाथ सलगर उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलsexual harassmentलैंगिक छळWomenमहिला