शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी MIDC भुखंड घोट्याळाचा तपास एसीबीकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:40 PM

खडसेंना पुन्हा अडकविण्याचा प्रयत्न...

पुणे: महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर आता सरकार बदलताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी एमआयडीसी भुखंड घोटाळ्याचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस बी हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात २०१६ अर्ज केला होता. आपल्या पदाचा दुरोपयोग केल्याचा आरोपी तत्कालीन भाजप सरकारमधील महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केला होता. खडसे यांच्या पत्नी व जावयाकडून पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील जमीन व्यवहार करण्यात आला होता.

यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, हा व्यवहार पूर्णपणे खासगी जमिनीचा झालेला असून कायद्याच्या चौकटीत करण्यात आल्याचा दावा खडसे यांनी केला होता. या कारणावरुन खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०१८ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीनचिट दिली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरु केली.

याबाबत अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, दमानिया यांनी न्यायालयात तक्रार दाखल करुन खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याची कागदपत्रे सादर केली होती. त्यावेळी तपास यंत्रणांनी त्याची दखल घेतली नाही. ईडीने आमच्याकडून यासंदर्भातील कागदपत्रे घेतली. त्या आधारे तपास केला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेण्यात आले आहेत. असे असताना आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयात या प्रकरणात पुढील तपास करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज सादर केला आहे. त्याला आम्ही हरकत नसल्याचे पत्र दिले आहे.

काय आहे प्रकरणफडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती. या समितीने सरकारला अहवाल दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेeknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीbhosariभोसरीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग