लोणावळा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या गडाच्या पायºया पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मार्ग धोकादायक झाला आहे. अनेक वर्षापासून भारतीय पुरातत्त्व विभागाने गडाच्या पायºया व सुरक्षा भिंतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे देवीच्या गडावर जाण्याचा प्रवास धोकादायक झाला आहे.कोळी, आग्री समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामीनी आई एकवीरेचे मंदिर व बुद्धकालीन कार्ला लेणी वेहेरगावात आहे. ऊन, वारा, पावसामुळे या लेणी परिसराच्या सुरक्षा भिंती व पायºया ठिसूळ होऊन ढासळू लागल्या आहेत. मागील तीन वर्षात चार वेळा गडावर दरड कोसळण्याचे प्रकार घडले असून सुरक्षा भिंती पडल्यामुळे गडावर फिरणे धोकादायक झाले आहे. पायºयांचा भराव खचल्याने चालणे मुश्किल झाले आहे. पाच पायरी मंदिराच्या खालील बाजूला पायरीचा केवळ एक दगड शिल्लक राहिला असून भराव खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. लेणीच्या पायºयाही दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून तुटल्याने बंद केल्या आहेत. भाविकांकडून लेणी पाहण्यासाठी पैसे घेणारे पुरातत्त्व खाते कामांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याने पुरातन वास्तू नामशेष होऊ लागल्या आहेत. महिनाभरात देवीच्या गडावर शारदीय नवरात्रो उत्सवाला सुरुवात होणार आहे. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येणार असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने गडाच्या पायºया दुरुस्त कराव्यात, अशी मागणी वेहेरगावातील गणेश पवार, संदीप देशमुख, प्रवीण देशमुख, दीपक देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे.सर्वत्र नाराजीवेहेरगावातील सामाजिक कार्यकर्ते व मनविसेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी गडाच्या पायºयांची छायाचित्रे व निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना दिले आहे. एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे व शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी भारतीय पुरातत्त्वचे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले असताना देखील पुरातत्त्व विभाग या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.आंदोलनाचा इशारा४कार्ला फाटा, गड पायथा व गडावर जाणारा मार्ग या सर्वच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाण्याची डबकी तयार झाली आहेत. वारंवार तक्रारी व आंदोलन करून देखील मावळचे सार्वजनिक बांधकाम विभाग कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने दर पावसात वेहेरगाव व दहिवली ग्रामस्थांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवरात्रीपूर्वी रस्ते दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
एकवीरा गडाची वाट बिकट पावसामुळे पायऱ्यांचा भराव गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 2:48 AM