पुणे : कात्रज परिसरात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी टँकरचालकाला अटक करण्यात आली.
रामशिरोमणी भोलेनाथ मिश्रा (वय ६०, रा. कुमार पामके्रस्ट सोसायटी, पिसोळी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक अनिल गोपीनाथ राजपंके (वय ३२, सध्या रा. वाशी, नवी मुंबई, मूळ रा. रायवाडी, जि. लातूर) याला अटक करण्यात आली. मिश्रा यांचा मुलगा मनीष यांनी यासंदर्भात भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रामशिरोमणी मिश्रा शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास कात्रज चौकातून राजस सोसायटीकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. मिश्रा यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.
----