पाटस : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गुरुवारी (दि. २१ मे) होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. दरम्यान, या सोमवार (दि. २0)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. शुक्रवारी (दि. २४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून, निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि. २३ मे) होईल. गटा-तटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागणार असल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्या निवडणुकीत राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली ‘जनसेवा पॅनल’ला घवघवीत यश मिळाले होते. त्या तुलनेत विरोधी पॅनलला एकही जागा मिळाली नव्हती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडूण आलेल्या कारखान्याच्या संचालकांना काही तांत्रिक अडचणींमुळे दोन वर्षे जास्तीचे मिळाले आहे. (वार्ताहर)विरोधक एकत्र येणार का?४‘भीमा पाटस’च्या निवडणूक लढविणार नाही. परंतु आमदार राहुल कुल यांच्या विरोधातील पॅनलला पाठबळ देण्याचे रमेश थोरात यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत यांचे या निवडणुकीत पॅनल राहील. परंतु भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यासह अन्य पक्ष एकत्रित येऊन एकच सक्षम पॅनल उभे करतील, अशी एकंदरीत तालुक्यात चर्चा आहे. समविचारांची बैठक घेणार४आमदार राहुल कुल म्हणाले, की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार समविचारी लोकांची बैठक एकत्रित घेऊन त्यातून जो काही निर्णय होईल, त्यानुसार निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. नेतृत्व करणार ४माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, की मी स्वत: या निवडणुकीत उभा राहणार नाही. मात्र, सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन एकच पॅनल टाकण्याच्या मन:स्थितीत असून, या पॅनलचे नेतृत्व मी करणार आहे. कारण कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना आर्थिक विळख्यातून बाहेर काढणे काळाची गरज आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी४भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणाले, की भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली असून, सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी गट-तट बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध करणे काळाची गरज आहे. काँग्रेस पक्षाला पाच जागा द्याव्यात४काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे म्हणाले, की काँग्रेस पक्षाला पाच जागा जो देईल, त्या पॅनलमध्ये आम्ही सहभागी होऊ; मग ते पॅनल आमदार राहुल कुलांचे असो किंवा माजी आमदार रमेश थोरातांचे. जर कुल आणि थोरात यांनी संधी दिली नाही, तर काँग्रेस इतर पक्षातील लोकांना एकत्रित करून पॅनल टाकेल, असे त्यांनी सांगितले.
‘भीमा-पाटस’ची निवडणूक २१ मे रोजी
By admin | Published: April 18, 2015 11:34 PM