शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

निवडणूक प्रचारही झाला इव्हेंट मॅनेजमेंट

By admin | Published: December 27, 2016 3:30 AM

निरपेक्ष कार्यकर्त्यांची वानवा प्रत्येकच पक्षाला जाणवू लागल्याने आता निवडणूक प्रचारही इव्हेंट मॅनेजमेंटसारखा झाला आहे. सर्व्हेपासून ते प्रचारापर्यंत आणि भाषणे लिहून देण्यापर्यंत

पुणे : निरपेक्ष कार्यकर्त्यांची वानवा प्रत्येकच पक्षाला जाणवू लागल्याने आता निवडणूक प्रचारही इव्हेंट मॅनेजमेंटसारखा झाला आहे. सर्व्हेपासून ते प्रचारापर्यंत आणि भाषणे लिहून देण्यापर्यंत एकाच छताखाली सर्व सेवा देणारे ग्रुप निर्माण झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या प्रचाराचे तंत्रच बदलले आहे. पूर्वी भेळ-भत्ता खाऊन काम करणारे कार्यकर्ते असायचे; पण हे चित्र बदलून गेले. कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च उमेदवाराला करावा लागतो. परंतु, यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारापासून सगळ्या गोष्टी करून देणारे वेगवेगळे ग्रुप निर्माण झाले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग फंडेही अवलंबिले जात आहेत. प्रामुख्याने नव्याने राजकारणात प्रवेश केलेल्या नवश्रीमंतांना त्यांनी ‘गिऱ्हाईक’ केले आहे. निवडणुकीसाठी शासनाचे निवडणूक कार्यालय, पोलिसांचा चरित्र पडताळणी विभाग, प्रचारपत्रकांची छपाई करणारे कारखाने यांच्याशी संपर्क असणाऱ्या माहीतगारांची उमेदवारांना गरज असते. प्रचारपत्रे घरोघर वाटण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, रिक्षाद्वारे लाऊडस्पीकरवर प्रचार करणे आणि फिरत्या वाहनांद्वारे चित्रफिती किंवा स्लाइड प्रदर्शन करणे, पदयात्रेत जाऊन प्रचार करणे, उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवणे, मतदान केंद्र माहिती होईल अशी चिठ्ठी पाठविणे, अशी अनेक कामे उमेदवारांना स्वत: किंवा कार्यकर्त्यांच्या संचाद्वारे करून घ्यावी लागतात. यंदाच्या निवडणुकीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्याने स्वतंत्रपणे मीडिया सेल सुरू केले जाण्याची शक्यता आहे. प्रचाराची आखणी करण्यापासून मतदारसंघामध्ये कोणत्या नेत्यांची भाषणे किंवा प्रचारसभा घ्यायच्या याचेही नियोजन महत्त्वाचे असते. त्याबरोबर मतदारराजासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, भोजनावळी ठेवून एकाच ठिकाणी हजारो जणांना एकत्र बोलाविण्याच्या युक्त्याही इच्छुकांना योजाव्या लागतात. ही सर्व कामे वेगवेगळ्या पातळ्यांवर करण्यासाठी उमेदवार आपले जवळचे कार्यकर्ते नियुक्त करतात. ऐन वेळी कोणताही प्रसंग उद्भवल्यास उमेदवारासह कार्यकर्त्यांची धावपळ होते. महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे एका मतदारसंघात १५ ते २० च्या संख्येने उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांची वानवा असणे अनेक उमेदवारांसाठी शक्य असते.कामांची जंत्री, हाती असलेला मोजका कालावधी, एकूणच निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा या पार्श्वभूमीवर गरज ओळखून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सर्व कामे करून देणाऱ्या व्यावसायिक यंत्रणा उदयाला आल्या आहेत. सर्व जणांकडे सर्व प्रकारचे संपर्क नसतात. त्यामुळे अशा यंत्रणांची गरजही भासू लागली आहे. व्यावसायिक कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या भक्कम रकमांपेक्षा हौशी, बेरोजगार युवकांकडून केल्या जाणाऱ्या कामांचे दर परवडण्यासारखे असल्याने उमेदवारांची पसंती अशा तरुणांच्या गटांना मिळत आहे. एसएमएसच्या आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घाऊक स्वरूपात मेसेज तज्ज्ञ कंपनीतर्फे पाठविण्यासाठी व्यवस्था केली जाते. त्यासाठी ब्रॉडकास्ट लिस्ट असलेल्या कंपन्यांशी संपर्क केला जातो. फेसबुकवर उमेदवाराचे एक किंवा दोन पेज तयार करून देणे, चित्रीकरण झालेल्या फितीचे संपादन करणे, प्रचारपत्राचा मजकूर लिहून देणे, मोठ्या नेत्याचा किंवा कलाकाराचा कार्यक्रम असल्यास बाऊन्सरची व्यवस्था करणे अशा स्वरूपाच्या कामासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. निवडणूक जशी जवळ येईल, तसे दरही वाढविले जातात. सामाजिक हेतू आणि कमाईसुद्धाअशा सर्व कामांचे सूत्रधारपद असणाऱ्या आणि पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका युवकाने सांगितले की बाहेरगाववरून शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या, आर्थिक स्थिती चांगली नसणाऱ्या तरुण-तरुणींना शिकताना कमाईही व्हावी यासाठी मी उमेदवारांसाठी काम पाहतो. त्यातून दोन पैसे मलाही मिळून जातात. सामाजिक हेतू डोळ्यांसमोर ठेवून व्यावसायिक काम, असे माझ्या कामाचे स्वरूप आहे. असेच काम शहराच्या विविध भागांत करणाऱ्या व्यक्ती असल्याची माझी माहिती आहे. माझा संपर्क अनेकांशी असल्याने उमेदवारांपर्यंत माझी माहिती जाते. उमेदवार स्वत:ही संपर्क साधतात. पैसे, कामाचा मोबदला खात्रीने मिळेल अशा ठिकाणीच आम्ही काम स्वीकारतो. काम चोखपणे करण्याची खात्री देऊन ते व्यवस्थित सुरू आहे किंवा असे यावर देखरेख ठेवतो. एखादा युवक व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला हटवून अन्य युवकाला संधी दिली जाते. वारजे, वाकड, भोसरी या भागांत आमचे कामही सुरू झाले.