पुणे : युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे स्मार्ट कार्ड ग्राह्य धरणार नसल्याचे सांगितले. यामुळे मतदानासाठी आलेले युवक चांगले संतप्त झाले. मतदान प्रक्रियेचे साहित्य फेकून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामुळे निवडणूक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादा-वादी झाली. पदाधिकाऱ्यांनी अखेर पोलिसांना बोलवून पुढील मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील अनेक भागात निवडणुका होत आहे. तर पुण्यात काँग्रेस भवन येथे दिलेल्या नियमावली नुसार दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे.या निवडणुकांचा बुधवार (दि.१२) अखेरचा दिवस असल्याने शहरातील अनेक भागातील काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस भवन येथे मतदान करण्यासाठी उपस्थित होते. निवडणुकीवेळी अधिकाऱ्यांकडून आधारकार्डची मागणी करण्यात आली. परंतु कार्यकर्त्यांनी आधारकार्डचे स्मार्ट कार्ड दाखवले. निवडणूक अधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले नाही. आधार कार्ड असल्यावर मतदान करता येईल,असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.त्यावरून कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे स्वरूप हमरी तुमरीत झाले. टेबल आपटण्यात आले.अधिकाऱ्यांच्या हातातील टॅब हिसकावून घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया त्यानंतर थांबवण्यात आली आहे. दरम्यान या वादामुळे काँग्रेस भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी व निवडणूक अधिका-यांमध्ये वादा-वादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 8:24 PM
काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
ठळक मुद्देयुवक काँग्रेस निवडणुक : स्मार्ट कार्ड ग्राह्य न धरल्याने युवक संतप्तया वादामुळे काँग्रेस भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त तैनात