शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

निवडणूक खर्च संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Published: May 21, 2017 3:54 AM

नगरपरिषदेच्या कारभारावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांतर्गतदेखील पडसाद उमटत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या काळात १२ लाख ४४ हजार रुपये खर्च आल्याचे

- लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : नगरपरिषदेच्या कारभारावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांतर्गतदेखील पडसाद उमटत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या काळात १२ लाख ४४ हजार रुपये खर्च आल्याचे नमूद करण्यात आले. निवडणुकीच्या काळातच कापडी मंडपाचा खर्च ५ लाख ५३ हजार ५२९ रुपये अदा करण्यात आले आहेत. या खर्चावर बारामती विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहेच. त्याचबरोबर नगरसेवकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. समांतर निर्णय घेण्याच्या प्रकारामुळे खातेप्रमुखांनादेखील कोणाचा धाक राहिलेला नाही, असेच चित्र आहे.जिल्ह्यात झालेल्या सर्व नगरपालिकांच्या तुलनेत फक्त बारामती नगरपालिकेचा व्हिडीओ चित्रीकरणाचा खर्च अधिक का, असे प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षांनादेखील या चित्रीकरणाच्या कामाचे बिल अंधारात ठेवून काढले आहे. या प्रकरणाची विरोधी नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, बबलू देशमुख यांनी चौकशीची मागणी केली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. या कामाची ई-निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र, स्थानिक साप्ताहिक आणि एका हिंदी दैनिकात त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक ३ लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या कामाला ई-निविदाच आवश्यक आहे. निवडणूक काळातील २८ दिवसांसाठी ८०० ठिकाणी चित्रीकरण केले, असा प्रशासनाचा दावा आहे. काम झाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत त्याचे १५५५ रुपयेप्रमाणे कराची कपात करून ११ लाख ५६ हजार रुपयांचे बिल अदा करण्यात आले. सीडी किती दिल्याचा तपशील नाही...ज्या एजन्सीला व्हिडीओ चित्रीकरणाचे काम दिले होते. त्यांनी बारामतीतील एकाला उपठेकेदारी दिल्याची माहिती पुढे आली आहे. आठशे ठिकाणी व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. त्याच्या स्वतंत्र सीडी नगरपालिकेला बिलाबरोबरच देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र आम्रपाली फोटो स्टुडिओ या एजन्सीच्या मालकाला नगरपालिकेला किती सीडी सादर केल्या, याची माहिती नाही. त्यांच्याकडे विचारणा केली असता २५० ते ३०० सीडी दिल्या असतील, असे मोघम उत्तर दिले जाते. आता तर त्या ठेकेदाराचा मोबाईलदेखील लागत नाही, असा नगरसेवकांचा आक्षेप आहे. या प्रकाराबाबत पालिकेकडून कोणताही खुलासा मिळत नाही, मुख्याधिकारी रजेवर असल्याने प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कागदोपत्री पुरावे सादर केले जाणार असल्याचे नगरसेवक सुनील सस्ते यांनी सांगितले.बारामती पालिकेने पकडली कागदोपत्री ५८० डुकरेव्हिडीओ चित्रीकरणाबरोबरच शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी २ लाख ४९ हजार रुपयांची तरतूद केली होती. ही रक्कम खर्ची टाकण्यासाठी ५८० मोकाट डुकरे पकडून जयशंकर मजूर संस्थेच्या ठेकेदाराने १०० किलोमीटर दूर सोडली आहेत, असा कागदोपत्री दावा करून कर वजा करता उर्वरित रक्कम ‘जयशंकर’ संस्थेला अदा करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील डुकरे पकडण्यासाठी नगरपालिकेने निविदा काढल्या. त्याचा ठेका देण्यात आला. प्रत्यक्षात डुकरे पकडण्याच्या दिवशी त्यांच्या मालकांनी अशरश: नगरपालिकेवर दगडफेक केली होती. आता ५८० डुकरे पकडून दूर सोडून दिली तरी त्याचा कोणाला थांगपत्ता कसा नाही, अशी विचारणा केली जात आहे. या प्रकरणीदेखील नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, बबलू देशमुख यांनी प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. नगरपालिकेने नव्हे, तर मालकांनीच डुकरे स्थलांतरित केली असल्याची माहिती पुढे आली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्याकडे डुकरांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी अगदी पोलिसांनी कळवून डुकरांच्या मालकांना समज दिली. तसेच लेखी नोटीस दिली होती. त्यामुळे अनेकांनी त्याची डुकरे स्वखर्चाने स्थलांतरित केली होती, अशी वस्तूस्थिती आहे. त्यांना बजावलेल्या नोटिसांची प्रत देण्यासदेखील टाळाटाळ केली जात आहे. मोकाट जनावरांमध्ये भटकी कुत्री, सोडून दिलेल्या गायी, म्हशी, वळू, बोकड आदींचा समावेश होतो. मात्र, तरतूद केलेली रक्कम खर्ची घालण्यासाठी तब्बल ५८० डुकरे पकडून १०० किलोमीटर दूर सोडल्याचा दावा केला आहे. हा व्यवहारदेखील संशयास्पद आहे. अगदी चार ते पाच वर्षांत ठेकेदार मालामाल कसा झाला, त्याचे हे उदाहरण आहे.नगराध्यक्षांच्या सहीविना बिल अदा...या बिलाची रक्कम अदा करताना व्हाऊचरवर नगराध्यक्षांची सही नाही हे विशेष. तत्कालीन नगराध्यक्ष योगेश जगताप यांची सही नसताना बिल अदा केले आहे. त्याचबरोबर फक्त मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने बिल अदा करण्यात आले आहे. त्याला या विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. या कामाचे ५ टप्प्यात बिले सादर करण्यात आली आहेत. परंतु बिल मात्र एकत्रित काढण्यात आले आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी आहे.मंडपाचा खर्च साडेपाच लाख...निवडणुकीच्या मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपाचा खर्च ५ लाख ५३ हजार ५२९ रुपये झाला आहे. त्यातील कराची रक्कम वगळून श्री साईनाथ मंडप अ‍ॅन्ड डेकोरेटर्सला अदा करण्यात आली आहे. या खर्चाचा तपशील मिळावा, अशीदेखील मागणी केली आहे.