पुणे : राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या दि पुना मर्चंट्स चेंबरची निवडणूक येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोरोनाने थैमान घातल्यामुळे दीड वर्षांपासून विविध सहकारी संस्था, संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच प्रकारच्या निवडणुका लांबल्या आहेत.
दि पुना मर्चंट्स चेंबरच्या कार्यकारिणीची मुदत जून महिन्यातच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे कार्यकारिणीला मुदतवाढ मिळाली होती. आता येत्या २६ नोव्हेंंबर रोजी निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे़.
यंदा इच्छुकांकडून पॅनेलच्या मोर्चे बांधणीसह मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. तसेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांशीही संपर्क साधला जात आहे. याबाबतचे अधिकृत चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरपासून अर्ज विक्री करण्यात येणार आहे. २० नाव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे.