पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (PDCC Bank) राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई या जिल्हा बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या चारही जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया 29 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले आहे.
या जिल्हा बँकांच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होत्या. त्यावर न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणी होऊन याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक याचिका दाखल करावी असे निर्देश देत सध्या दाखल असलेल्या या याचिका फेटाळून लावल्या. दाखल याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने या चारही जिल्हा बँकांच्या निवडणूक न्यायालयाचे पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नये असे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरण आला दिली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी न्यायालयाने सुनावणी घेऊन निवडणूक घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि मुंबई या चारही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्यासाठी 29 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा सुरू होईल. त्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम सहकारी प्राधिकरणाच्या मान्यतेने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करावा असे प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सांगितले.