इंदापूर तालुक्यामध्ये एकूण ६० ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. यामध्ये आज सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रिया व प्रथम सभा घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर तहसीलदार यांना दिलेले आहेत. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी यासंदर्भात ६० ग्रामपंचायतींसाठी ६० अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करून आदेशीत केलेले आहेत.
यामध्ये नऊ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत रेडा, काटी, चिखली, सणसर, सपकळवाडी, पिठेवाडी, निंबोडी, पिंपरी बुद्रुक, निरा नरसिंहपुर, भांडगाव, गोंदी, गलांडवाडी नं.२, तरंगवाडी, शहा, कळस, रुई, कळंब, वालचंदनगर, लासुर्णे, अंथुर्णे, निमसाखर, गोतोंडी, हगारवाडी, वरकुटे खुर्द, व्याहळी, निमगाव केतकी, सराफवाडी, पिटकेश्वर, निरवांगी, कुंभारगाव, पोंदवडी, भिगवण, पिंपळे, शेटफळगढे, तक्रारवाडी, अकोले, बलपुडी, लोणी देवकर, चांडगाव या ग्रामपंचायत ग्रामसभा पहिली होणार असून यामध्ये निवडणूक घेऊन सरपंच,उपसरपंच निवडी होणार आहेत.
यासंदर्भात इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना वरील नमूद ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडी संदर्भातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना इंदापूर तहसील कार्यालयामार्फत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आहेत. चाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीची आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होणार आहेत व उर्वरित वीस ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी १० फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.