सासवड : सासवड नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बुधवारी (दि.३) नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत बिनविरोध करण्यात आल्या. तर उपनगराध्यक्षपदी वसुधा विश्वजित आनंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विषय समिती निवडीचे पीठासीन अधिकारी म्हणून पुरंदरचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी तर उपनगरध्यक्ष पदाच्या निवडणुकीची विशेष सभाचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी पीठासीन अधिकऱ्यांना सहकार्य केले.
उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी जनमत विकास आघाडीच्या वसुधा आनंदे यांचे तीन अर्ज प्राप्त झाले. तीनही अर्ज वैध असल्याने पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी उपनगराध्यक्ष म्हणून आनंदे यांची निवड घोषित केली. स्थायी समितीचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती व इतर समित्यांचे सभापती याचे पदसिद्ध सदस्य असतात. तर उपनगरध्यक्ष हे पाणी पुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती असतात. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप यांचे आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप यांसह सर्व नगरसेवक, आजीमाजी पदाधिकारी यांसह पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख, सासवडकर नागरिक उपस्थित होते.
विविध समित्या व त्यांचे सभापती, सदस्य पुढीलप्रमाणे
महिला व बालकल्याण समिती
सभापती - सीमा महादेव भोंगळे, उपसभापती - विद्या श्रीकांत टिळेकर, सदस्य - निर्मला यशवंत जगताप, आनंदीकाकी जगताप, डॉ. अस्मिता रणपिसेे.
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती
उपनगरध्यक्ष व सभापती - वसुधा विश्वजित आनंदे, सदस्य - पुष्पा नंदकुमार जगताप, माया रवींद्र जगताप, सारिका हिरामण हिवरकर, मंगल सुधाकर म्हेत्रे.
बांधकाम समिती
सभापती - विजय शिवाजी वढणे, सदस्य- सुहास दत्तात्रय लांडगे,
संजय गणपत जगताप, दीपक दत्तात्रय टकले, बाळासाहेब पांडुरंग पायगुडे.
आरोग्य व शिक्षण समिती
सभापती - मनोहर ज्ञानोबा जगताप, सदस्य - अजित काळुराम जगताप, प्रवीण लक्ष्मण भोंडे, सचिन सुरेश भोंगळे, संजय मारूती चौरे.
स्थायी समिती
नगराध्यक्ष तथा सभापती - मार्तंड लक्ष्मण भोंडे, सदस्य - वसुधा आनंदे, सीमा भोंगळे, विजय वढणे, मनोहर जगताप, आनंदीकाकी जगताप.
०४ सासवड मार्तंड भोंडे
०४ सासवड वसुधा आनंदे
०४ सासवड सीमा भोंंगळे
०४ सासवड विजय वढणे
०४ सासवड मनोहर जगताप