पुणे - आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा शिवसेनेने केली असली तरी भाजपाच्या दबावापुढे त्यांना युतीतून वेगळं होता येणार नाही, असे भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.संभाजीराव काकडे यांच्या गौरव सोहळ्यात चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवू नये यासाठी भाजपाकडून नानाप्रकारे दबाव आणला जाईल. या दबावापुढे झुकण्याशिवाय शिवसेना नेतृत्वापुढे पर्याय नसेल. देशाच्या राजकारणाचे चित्र बदलण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे सांगत चव्हाण पुढे म्हणाले, महाराष्टÑात नवी राजकीय समीकरणे मांडावी लागतील. आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र आले तर सध्याचे राजकीय चित्र बदलायला वेळ लागणार नाही. काकडे यांच्या सारख्या लोकनेत्याने सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चव्हाण यांनी केले.सत्कारा उत्तर देताना काकडे म्हणाले, कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी असून हे दुहीचे द्योतक आहे. नोटबंदी व जीएसटीने देशाचे वाटोळे केले. शेतकºयांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. देशातील एक टक्का लोकांकडे ७३ टक्के संपत्ती असेल तर आपण कुठे चाललो याचा विचार करावा लागेल.
भाजपाच्या दबावापुढे शिवसेनेचे स्वबळावर निवडणुका लढणे अशक्य - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 5:01 AM