'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:47 PM2024-10-29T12:47:01+5:302024-10-29T12:48:19+5:30

आमच्या विरोधात उमेदवार कोण आहे त्याची आम्हाला काही देणे घेणे नाही

'Elections have been taken in the hands of the people, so anyone can come forward' Bapu Pathare filled the nomination form. | 'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

पुणे : विरोधात कोण आहे त्याची आम्हाला देणे घेणे नाही. फक्त विकास हाच आमचा मुद्दा असणार आहे. आणि विकासाचा मुद्दाच आम्हाला जिंकून देणार आहे. कुणीही उभं राहिले तरी ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. जनतेनेच ठरवले त्यांना आमदार कोण पाहिजे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आमचा विजय पक्का आहे, असे म्हणत वडगाव शेरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विश्वास व्यक्त केला. 

वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शनकरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वडगाव शेरी गावातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅलीला सुरुवात केली. यावेळी मतदार संघातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. जागोजागी बापू पठारे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत केले जात होते. 

दरम्यान उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बापूसाहेब पठारे यांनी विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला. बापूसाहेब म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जोरावर मी ही निवडणूक जिंकणार आहे. आमच्या विरोधात उमेदवार कोण आहे त्याची आम्हाला काही देणे घेणे नाही. फक्त विकास हा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. आणि विकासाचा हाच मुद्दा आम्हाला निवडणूक जिंकून देणार आहेत. मुळात ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. जनतेनीच ठरवले की त्यांना बापूसाहेब पठारे आमदार हवाय.

बापू पठारेंच्या विरोधात सुनील टिंगरे 

माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वडगाव शेरीमध्ये टिंगरे विरुद्ध पठारे यांची मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बापू पठारे यांनी २००९ साली विधानसभा लढवून राष्ट्रवादीचा झेंडा वडगाव शेरात फडकवला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट विरोधात शरद पवार गट अशी लढत होणार आहे. मतदार कोणाला साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: 'Elections have been taken in the hands of the people, so anyone can come forward' Bapu Pathare filled the nomination form.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.