- नेहा सराफ ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तृतीयपंथी, लिंगबदल करून घेतलेल्या, समलैंगिक (एलजीबीटी) व्यक्तींना भारतीय समाजात आजही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळेच सार्वजनिक जीवनात या मंडळींना फारसे स्थान नसते. ही परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचे मतदार यादीवरून आणि राजकीय पक्षांच्या प्राधान्यांवरून दिसू लागले आहे. पुण्याच्या यापूर्वीच्या मतदारयादीत तृतीयपंथीयाची एकमेव नोंद होती. यंदाच्या मतदारयादीत ती थेट १३९ वर गेली आहे.
वास्तवात एलजीबीटी समूहातील व्यक्तींची संख्या याहून अधिक आहे. मात्र जागरूकतेचा अभाव, सामाजिक दडपण, वाळीत टाकण्याची भीती आदी कारणांमुळे एलजीबीटी व्यक्ती उघडपणे समाजासमोर येत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, की एलजीबीटींची मतदार नोंदणी न होण्यामागे त्यांची नकारात्मकता कारणीभूत नाही. ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्र नसल्याने इच्छा असूनही अनेकांचे नाव यादीत येत नाही. कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक तृतीयपंथी उदरनिर्वाहासाठी पुण्यात येतात. त्यांच्याकडे पुण्यातल्या रहिवासाचा दाखला नसतो. पण सध्या आधारकार्डाची सक्ती झाल्याने अनेकांनी ओळखपत्र करून घेतले. त्यामुळे मतदार नोंदणी वाढली.
एलजीबीटी समूहाला समाजाने स्वीकारावे, यासाठी पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये चळवळ सुरु झाली आहे. त्यामुळे राजकीय स्तरावर एलजीबीटींना प्रतिनिधित्व देण्याचीही सुरुवात झाली आहे. काँग्रेसने तृतीयपंथी व्यक्तीला पक्ष संघटनेत स्थान देत सोनाली दळवी यांच्याकडे सरचिटणीसपद सोपवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांदणी गोरे यांना शहर उपाध्यक्षपदी नेमले आहे. दिशा शेख यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्तेपद आले आहे.समाजातल्या एलजीबीटी व्यक्तींचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे या वर्गासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सांगतात. मात्र समाजाकडून दडपण, बहिष्कार, हिंसा, घृणा वाट्याला येण्याच्या भीतीतून त्या व्यक्त होत नाहीत. समलैंगिक स्त्रिया (दीड टक्के), समलैंगिक पुरुष (तीन टक्के), उभयलिंगी (पाच टक्के), तृतीयपंथी-लिंगबदल (दर दोनशे व्यक्तींमागे एक) असे आहेत.
तृतीयपंथीयांच्या हाताला काम देण्याची गरजतृतीयपंथीयांच्या हाताला काम अर्थात त्यांना नोकºया देण्याची जास्त गरज असल्याचे तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आप्पा पुजारी यांनी सांगितले. ते म्हणाले, की राजकीय पक्षात प्रवेश देणे ठीक आहे; पण शिक्षण घेऊनही भीक मागण्याची वेळ अनेकांवर येते.शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. पुण्यातल्या तृतीयपंथींची संख्या १३९ पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते मतदार होऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रशासन काय करते, असा सवालही पुजारी यांनी केला.तृतीयपंथीयांच्या हाताला काम देण्याची गरज४तृतीयपंथीयांच्या हाताला काम अर्थात त्यांना नोकºया देण्याची जास्त गरज असल्याचे तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आप्पा पुजारी यांनी सांगितले. ते म्हणाले, की राजकीय पक्षात प्रवेश देणे ठीक आहे; पण शिक्षण घेऊनही भीक मागण्याची वेळ अनेकांवर येते.४शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. पुण्यातल्या तृतीयपंथींची संख्या १३९ पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते मतदार होऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रशासन काय करते, असा सवालही पुजारी यांनी केला.