शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना पुणेकरांची मिळतेय पसंती; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 11:27 AM

लॉकडाऊनचे तीन महिने विक्री बंद असूनही इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांची विक्री मागील वर्षीपेक्षा लक्षणीय वाढल्याचे दिसते.

ठळक मुद्देइलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने दुचाकीला अधिक मागणी सीएनजीमध्ये प्रामुख्याने रिक्षा, बसला मागणी

पुणे : अनलॉकमध्ये वाहन विक्रीमध्ये वाढ होत असून आतापर्यंत पुण्यातील हा आकडा लॉकडाऊनपूर्वीच्या विक्रीच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत पोहचला. पण यामध्ये इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांची विक्री पेट्रोल व डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १००४ इलेक्ट्रिक तर ४३१ सीएनजीव वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी लॉकडाऊनमध्ये वाहन विक्री ठप्प असूनही काही महिन्यांतच ही संख्या अनुक्रमे ९१७ व १३३६ पर्यंत गेली आहे.

लॉकडाऊनमध्ये जवळपास तीन महिने वाहन विक्री ठप्प होती. मागील चार महिन्यांपूर्वी विक्रीला सुरूवात झाल्यानंतर अत्यंत कमी प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली. हळूहळू ही विक्री वाढू लागली आहे. लॉकडाऊनपूर्वी सुमारे २० हजार वाहनांची दरमहा विक्री होत होती. सध्या हे प्रमाण १० हजारांच्या जवळपास आहे. प्रामुख्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री अधिक आहे. पण त्यामध्येही इलेक्ट्रिक व सीएनजी वरील वाहनांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढली असल्याचे दिसते.

केंद्रीय वाहन प्रणालीच्या डॅशबोर्डनुसार, वर्ष २०१८ मध्ये पुण्यात ४८६ इलेक्ट्रिक व ४९ सीएनजी वाहनांची विक्री झाली होती. २०१९ मध्ये ही विक्री अनुक्रमे १००४ व ४३१ पर्यंत वाढली. तर २०२० मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत ९१७ व १३३६ पर्यंत गेली आहे. लॉकडाऊनचे तीन महिने विक्री बंद असूनही हा आकडा मागील वर्षीपेक्षा लक्षणीय वाढल्याचे दिसते. बाजारात विविध कंपन्यांकडून नवीन मॉडेल आणली जात आहेत. या वाहनांच्या किंमतीही हळुहळू कमी होत आहेत. तसेच प्रदुषणविरहित इंधनामुळे लोकांचे आकर्षण वाढत असल्याचे निरीक्षण परिवहन अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले आहे.---------------------मागील तीन वर्षांतील वाहन विक्रीची स्थिती (एमएच १२)वाहन                     २०१८           २०१९              २०२० (२१ ऑक्टो.पर्यंत)इलेक्ट्रिक                 ४८६            १००४               ९१७सीएनजी                  ४९             ४३१                 १३३६डिझेल                    ३५,१०६      ३२०४९              १३४३२पेट्रोल                    २,१४,३८०    १,८७,५४३          ८१,४००--------------------------------------------------वर्ष २०२० मधील विक्री (एमएच १२)वाहन          ऑक्टोबर    सप्टेंबर        ऑगस्ट       जुलैइलेक्ट्रिक       ८१            १५७            १३६            ४३सीएनजी       ८५             २१२            १६५           ११२-------------------------------------------------एकुण वाहन विक्री (एमएच १२)२०२० (२१ ऑक्टो.पर्यंत) - १,०७,२०३२०१९ - २,४४,८४०२०१८ - २,७८,६३३--------------इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने दुचाकीला अधिक मागणी आहे. कंपन्यांकडून नवीन मॉडेल बाजारात आणली जात आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे नागरिकांनाही आकर्षण वाटत आहे. ज्यांच्याकडे चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे, ते इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत. सीएनजीमध्ये प्रामुख्याने रिक्षा, बसला मागणी आहे. या वाहनांची विक्रीही वाढत आहे.- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे------------

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलरelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनpollutionप्रदूषण