आव्हाळवाडी : वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथे बोल्हाई देवी मंदिराजवळ व जिल्हा परिषद शाळा बोल्हाई मंदिर व जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेशेजारी खेटूनच जुनी विद्युतवाहक डीपी आहे. या डीपीची फ्यूजपेटी ही पूर्णपणे खाली बसवली असून, विद्युत फ्यूज पेटी बोल्हाई मंदिर रस्त्यावरच पूर्णपणे मोकळ्या अवस्थेत उघडा ठेवला आहे. त्या पेटीत लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत कोणाचाही हात पोहोचेल अशी धोकादायक अवस्था त्याठिकाणी निर्माण झाली आहे.बोल्हाई मंदिर परिसरात धोकादायक वीज फ्यूजपेटीला खेटूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हाई मंदिरात दर्शनासाठी व देवीच्या दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त आणि जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही उघड्यावरील वीजवाहक फ्यूज पेटी धोकादायक ठरत आहे. या धोकादायक अवस्थेकडे लोकप्रतिनिधीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना दिली असून, अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करताना पाहावयास मिळत आहे. माजी सरपंच विद्याधर गावडे यांनी याबाबत विद्युत मंडळ अधिकारी यांना निवेदन दिले आहे. मल्हारी गावडे, विठ्ठल गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, आम्ही वीज वितरण कंपनीच्या बोर्डाला ही वीज वाहक फ्यूजपेटी बदलण्यासाठी पत्र दिले आहे, त्यांनी सांगितले आहे की डीपी बदलतो. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठवला होता, परंतु अजून फ्यूजपेटी तशाच अवस्थेत आहे.
वाडेबोल्हाई येथील वीजपेटी धोकादायक
By admin | Published: March 21, 2017 5:01 AM