पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथील लघुउद्योजकाच्या साईटवर नवीन ट्रान्सफॉर्मर व नवीन औद्योगिक वीज मीटर कनेक्शन देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता व खासगी व्यक्तीला सापळा रचून पकडण्यात आले़कनिष्ठ अभियंता विकास कुमार रस्तोगी (वय ३४, रा़ रांजणगाव, ता़ शिरुर) आणि दीपक कपाजी गव्हाणे अशी त्यांची नावे आहेत़ तक्रारदार हे राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत ठेकेदार आहेत़ त्यांनी रांजणगाव एमआयडीसी येथील एका लघु उद्योजकाचे साईटवर नवीन ट्रान्सफॉर्मर व नवीन औद्योगिक वीज मीटर कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला होता़ वीज मीटर कनेक्शन देण्यासाठी विकास रस्तोगी यांनी त्यांच्याकडे १२ हजार रुपयांची मागणी केली होती़ त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी रांजणगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला़ दीपक गव्हाणे याच्यामार्फत १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले़ (प्रतिनिधी)
वीज वितरणचा अभियंता जाळ्यात
By admin | Published: January 13, 2017 3:45 AM