शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

वीज यंत्रणेची कामे होईनात, आडमुठेपणाची महावितरणवर वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:23 AM

दर वर्षी सुमारे १० टक्के विजेची मागणी व वीजग्राहकांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने वीज यंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरण सुरू केलेले होते.

पुणे : दर वर्षी सुमारे १० टक्के विजेची मागणी व वीजग्राहकांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने वीज यंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरण सुरू केलेले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून खोदाई शुल्काच्या तिढ्यामुळे पुणे शहरातील नवीन वीज यंत्रणेच्या विस्तारीकरणाचे व सक्षमीकरणाचे काम जवळजवळ ठप्प आहे. अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वीजपुरवठा खंडित होणे, वीजपुरवठ्याची पयार्यी व्यवस्था उपलब्ध नसणे किंवा भार व्यवस्थापन शक्य न होणे आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.पुणे शहरात ओव्हरहेड वीजतारा टाकण्याऐवजी भूमिगत वाहिन्या टाकण्याचे कामे विविध योजनांत प्रस्तावित करण्यात आले होते. शहरात प्रस्तावित ४ उपकेंद्रांची उभारणी पूर्ण झालेली आहे. परंतु, पालिकेने खोदाईसाठी परवानगी न दिल्यामुळे तसेच खोदाई शुल्काच्या तिढ्यामुळे बाणेर व शिवाजीनगरमधील ही उपकें्रदे अद्यापही कार्यान्वित होऊ शकलेली नाहीत.खोदकामाच्या परवानगीसाठी महिनोन् महिने लागत असल्याने कामे थांबली आहे. नोव्हेंबर २०१२मध्ये पुणे महापालिकेने केवळ १,५०० रुपये प्रतिरनिंग मीटर असलेले खोदाई शुल्क २,६०० रुपये केले. त्यानंतर एप्रिल २०१३मध्ये ते दोन हजार रुपये करण्यात आले. नंतर मे २०१४मध्ये ज्या रस्त्यांवर पीव्हीसी किंवा आरसीसी पाईप टाकण्यात आले आहेत, तेथील खोदकामासाठी तब्बल ५,९५० रुपये व ज्या ठिकाणी डक्ट नाहीत तेथे रस्ते खोदाई करून भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी ५,५४७ रुपये खोदाई शुल्क निश्चित करण्यात आले.नागरिकांच्या दबावामुळे मे २०१५मध्ये पुणे महापालिकेने महावितरणसाठी २,३०० रुपये प्रतिरनिंग मीटर खोदाई शुल्क मंजूर केले. इतर शासकीय कंपन्यांना ५,५४७च्या खोदाई शुल्कात ५० टक्के सूट दिली होती. त्याप्रमाणे महावितरण हा खर्च स्वत: सोसून आतापर्यंत ही कामे सुरू होती. परंतु, जून २०१७मध्ये पुन्हा खोदाई शुल्कात ठराव घेऊन फेरबदल करण्यात आले. त्यानुसार रिइन्स्टेटमेंट शुल्कापोटी प्रतिरनिंग मीटर २,३५० रुपये दोन वर्षांसाठी अनामत रक्कम देणे, रिइन्स्टेंटमेंटची कामे करून देणे व दोन वर्षांच्या कालावधीत हे काम खराब झाल्यास किंवा खचल्यास त्यासाठी येणारी दुरुस्तीची रक्कम अनामत रकमेतून वळती करणे. तसेच, पुणे महापालिकेला ५,५४७ रुपये प्रतिरनिंग मीटरनुसार ११ टक्के रक्कम सुपरव्हिजन चार्जेस म्हणून देणे, अशी सध्या खोदाई शुल्काची आकारणी करण्यात आलेली आहे. सध्याच्या खोदाई शुल्कानुसार महावितरणला ६१०.१० रुपये सुपरव्हिजन चार्जेस तसेच खोदाईनंतरच्या रिइन्स्टेंटमेंटचा खर्च सुमारे २,३०० असे एकूण २,९१० रुपये प्रतिरनिंग मी. खोदाई शुल्क आकारण्यात आले. तसेच, प्रतिरनिंग मीटर २,३५० रुपये दोन वर्षांसाठी अनामत ठेवावी लागणार आहे. त्याप्रमाणे सद्य:स्थितीत प्रतिरनिंग मीटरसाठी सुमारे ५,२०० रुपयांचा सुरुवातीचा खर्च करावा लागणार आहे, जे महावितरणला शक्य नाही.

टॅग्स :Puneपुणे