----
कडूस : नजीकच्या आदिवासी समाजाच्या रुकेदरा (ता. खेड) वस्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पथदिवे बसविण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज पोचली असून पहिल्यांदाच गावातील घराघरांत विजेचा लख्ख प्रकाश पडला. त्यामुळे ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या ऐतिहासिक उपक्रमाचेवेळी, रुकेदरा ठाकरवाडीतील नागरिकांना स्वतःचे मालकीच्या मीटरचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कडूस गावापासून ४ किलोमीटर अंतरावर आदिवासी ठाकर बांधव अनेक पिढ्यांपासून रहात आहे. याच ठाकरवाडीमध्ये सुमारे २०० लोकांची वस्ती आहे. या लोकांना प्रकाशासाठी घरात राॅकेलची चिमणी, कंदील तसेच शालेय विद्यार्थ्यांना मेणबत्तीचा वापर करावा लागत होता. गावामध्ये पथदिवे आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कैलास मुसळे, विद्युत वितरण समिती सदस्य रविंद्र गायकवाड यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मदतीने प्रयत्न केले त्यामुळे अखेर २०२१ मध्ये घराघरांत विजेचा प्रकाश आल्याने स्थानिक ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले.
या वेळी सभापती अरुण चांभारे, जि. प. सदस्य अशोक शेंडे, सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, उद्योजक प्रताप ढमाले, सुजाता पचपिंड, मनीषा टाकळकर, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता संतोष गरुड, उपअभियंता संतोष तळपे, सहायक अभियंता फालके, चेअरमन पंडित मोढवे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, अनिकेत धायबर, शहनाज तुरुक, लता ढमाले, बारकू गायकवाड,सुधा पानमंद, विजया नाईक, अभिनाथ शेंडे, बाळासाहेब धायबर, रविंद्र गायकवाड, विलास गारगोटे, दत्तात्रेय ढमाले, चंद्रकांत पानमंद, बाळासाहेब बोंबले, मारुती जाधव, बबलू शेखा, राजेंद्र गारगोटे, अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
--
चौकट
चार वर्षांपूर्वी हातपंपाने सुटली पाण्याची समस्या
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी, चार वर्षांपूर्वी आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन कुपनलिका घेतली घेतली होती. त्यावर हातपंप बसविण्यासाठी, चेअरमन पंडित मोढवे यांनी, मित्र मंडळाच्या मदतीने दोन एचपीचा सबम स्रिमबल पंप बसविण्यात आला. यामुळे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या आदिवासी लोकांची कायमची समस्या सुटली गेली.
--
सोबत २४ कडूस वीज पोचली
विजेच्या मीटरचे वाटप करताना जि. प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे.