पुणे : वीजचोरांना ‘शॉक’ देण्यासाठी महावितरणने १० नवीन भरारी पथकांची स्थापना केली आहे. त्याद्वारे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल १३१ कोटी ५० लाख रुपयांची वीज चाेरी उघड झाली आहे. यात २ हजार ६२५ प्रकरणे उघड झाली. त्यांच्याकडून ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीजचोरी, विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरुद्ध जलद कारवाई करण्यासाठी हे पथके काम करत आहे.
वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे, त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. महावितरणची आर्थिक घडी सुधारण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भरारी पथकांनी अधिक सक्षमपणे काम करून वीज चोरीस लगाम घालावा, असे निर्देश सिंघल यांनी दिले.
नोव्हेंबर-२०२१ पासून विभागीय कार्यालय स्तरावर २० भरारी पथके सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास २० प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
बिलांची रक्कमही हाेणार वसूल
सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी पथक कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीज चोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली. वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंडदेखील वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरच संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
प्रादेशिक कार्यालयांतील भरारी पथके
कोकण -२२, पुणे -१४, नागपूर - १५, औरंगाबाद - १२
वीजचोरीवर्ष प्रकरणे रक्कम (कोटींत) वसुली (कोटींत)
२०१९-२० ९,२५० ९७.५० ५४.३६२०२०-२१ ७,१६९ ८७.४९ ५३.१८२०२१-२२ १३,३७० २६४.४६ १२४.९८