शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

अकरा सहायक आयुक्तांच्या बदल्या

By admin | Published: August 17, 2016 12:57 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. या संदर्भातील आदेश मंगळवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले असून, तत्काळ बदलीच्या जागेवर रुजू व्हा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. या संदर्भातील आदेश मंगळवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले असून, तत्काळ बदलीच्या जागेवर रुजू व्हा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे काही विभागप्रमुखांनी आदेश मिळताच पदभार आणि अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. अचानकपणे केलेल्या बदलांमुळे काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून स्थायी समितीत मंजूर होणारे ठराव, नागरवस्ती विभाग, नगररचना, बांधकाम परवाना विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण, उद्यान, भांडार विभाग, स्थापत्य, जनता संपर्क विभाग या विषयी तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित केले. आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार आज आयुक्त वाघमारे यांनी नऊ सहायक आयुक्तांच्या आणि दोन प्रशासन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयाचा कार्यभार सुभाष माछरे यांच्यावर सोपविला आहे. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यभारासह चंद्रकांत खोसे यांच्याकडे अग्निशामक विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा विभागाचा कार्यभार सोपविला आहे. ई क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालयासह कामगार कल्याण विभागाचा कार्यभार सोपविला आहे. मनोज लोणकर यांच्याकडे फ क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. सह आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे करसंकलन, अभिलेख जबाबदारी सोपविली आहे. (प्रतिनिधी)