पुणे : अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीत रिक्त राहिलेल्या रिक्त जागांचा तपशील व महाविद्यालयांचे कटआॅफ वेळापत्रकानुसार बुधवारी जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते जाहीरच करण्यात आले नाही. तिसºया फेरीत किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला याची माहितीही उपलब्ध न झाल्याने या प्रक्रियेत गोंधळ झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविली जात आहे. तिसºया गुणवत्ता यादी २८ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर या यादीत प्रवेश मिळालेल्या अकरावीच्या तिसºया फेरीसाठी ३५ हजार १७३ अर्ज केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडे आलेले आहेत. सध्या रिक्त असलेल्या प्रवेशाच्या जागांची संख्या ४४ हजार ६५० इतकी आहे. मात्र विद्यार्थ्यांना हवे असलेले महाविद्यालय व त्यांना मिळालेले गुण यांचा ताळमेळ बसत नसल्याने पहिल्या दोन फेºयांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. तिसºया फेरीसाठी ३५ हजार १७३ विद्यार्थ्यांचे समितीला प्राप्त झाले होते. दुसºया फेरी अखेरपर्यंत ४७ हजार २० विद्यार्थ्यांना आतापर्यंत महाविद्यालयात प्रवेश मिळाले आहेत.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक हुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:20 AM