पुणे : अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय प्रक्रियेतून अल्पसंख्याक महाविद्यालये वगळण्यात आल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. अकरावीच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, (दि. १९) जाहीर होईल. त्यानंतर तिसºया फेरीला सोमवारपासून (दि. २३) सुरुवात होणार आहे.अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक केंद्रीय प्रवेश समितीकडून बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १९ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १९ ते २१ जुलै २०१८ या कालावधीमध्ये प्रवेश घेता येणार आहेत. त्यानंतर २३ जुलै रोजी रिक्त जागा व दुसºया यादीतील कटआॅफ संकेतस्थळावर जाहीर केले जातील.न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील ५७ अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील १४ हजार रिक्त जागा त्या त्या महाविद्यालयांकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्या जागांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने न होता, त्या त्या महाविद्यालयस्तरांवर होणार आहे.>२६ जुलैैला गुणवत्ता यादीप्रवेशाच्या तिसºया फेरीला २३ जुलैपासून सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना २३ व २४ जुलै रोजी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलता येतील किंवा नव्याने एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांनाही अर्ज भरता येईल.२६ जुलै रोजी तिसºया फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल. २६ ते २८ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येतील. चौथ्या फेरीला ३० जुलैपासून सुरुवात होईल. २ आॅगस्ट रोजी चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल.
अकरावीची तिसरी फेरी २३ तारखेपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:15 AM