वसई : राज्यातील गडकोटांची दुरावस्था, किल्ल्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी दुर्गमित्रांनी विभागवार निवेदने व विनंती पत्रे देऊनही केंद्रीय पुरातत्व विभागाने अजून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. याउलट ऐतिहासिक वसई किल्ल्यात विविध सण-उत्सव साजरे करण्यास पुरातत्त्व विभागाने सक्त मनाई केली आहे.
दरम्यान, वसई विजयोत्सव, दीपोत्सव अशा प्रकारचे कार्यक्रमही यापुढे किल्ल्यात साजरे करता येणार नाही असे पुरातत्त्व खात्याने जाहीर आदेशच मधल्या काळात पारित केले होते. यामुळे महाराष्ट्रातील समस्त दुर्गमित्र संतप्त झाले असून शनिवार पासून दुर्गप्रेमी पुरातत्त्व खात्याचा निषेध म्हणून वसईच्या चिमाजी अप्पा किल्यात एल्गार आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत.
एकूणच गडकोटांवर सुरू असलेले गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थितीवर पुरातत्व खात्याकडून ठोस उपाययोजना करावी, या एकमेव मागणीसाठी समस्त दुर्गमित्र महाराष्ट्र भर एकित्रतपणे येऊन वसई किल्ला येथे दि.१५ व १६ डिसेंबर रोजी एल्गार आंदोलन करण्याचा इशारा आधीच दुर्गप्रेमींकडून देण्यात आला होता. त्यातच पुरातत्व खात्याने दुर्गप्रेमीं व त्यांच्या धार्मिक कार्यक्र मासाठी मनाईचा आदेश ही काढला. त्या अनुषंगाने हे एल्गार आंदोलन वसई किल्ल्यात किल्ले अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पासून सुरु झाले आहे. किंबहुना वसई सहित राज्यातील गडकिल्यांवरच्या वाढत्या समस्या व त्यांच्या प्रश्नांवर दुर्गमित्रांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उचलेले हे आंदोलन स्वरूपी पाऊल अत्यंत महत्वाचे ठरेल असा आशावाद दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.विक्रमी सहभागशनिवार -रविवार या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायं. ७.०० या वेळेत समस्त दुर्गमित्र, अभ्यासक केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वसई किल्ल्यातील कार्यालयासमोर बसून आपल्या मागण्या, निवेदने, प्रतिक्रि या, विनंती पत्रके इत्यादी बाबी समोर ठेवल्या. यासाठी नाशिक, मुंबई, भाईदर, शिरगाव, माहीम, पुणे येथून अनेकांनी विक्र मी सहभाग नोंदवला आहे.पुरातत्व खाते जबाबदारी नाकारतेराज्यातील गडकोटांवर वाढती अश्लीलता, विनापरवाना छायाचित्रणे, प्रेमीयुगलांचे थैमान, पुरातत्व विभागाची अनास्था, कार्यपद्धती इत्यादी बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी समस्त दुर्गमित्र सामाजिक संघटने मार्फत लढत आहेत तर आता धार्मिक कार्यक्र मास ही बंदी घालून पुरात्तव खात्याने एकप्रकारे आपले अंग झटकू पाहत आहे .पुरातत्त्वची मनाई; दुर्गमित्रांकडून निषेधऐतिहासिक वसई किल्ल्यात विविध सण-उत्सव साजरे करण्यास पुरातत्त्व विभागाने मनाई केली आहे. वसई विजयोत्सव, दीपोत्सव अशा प्रकारचे कार्यक्र मही किल्ल्यात साजरे करता येणार नाही, असे पुरातत्त्व खात्याने जाहीर केल्याने दुर्गमित्र संतप्त झाले असून या आंदोलनाने त्यांनी पुरातत्व खात्याचा निषेध नोंदल आहे. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे.काय आहे उल्लंघन आदेशकिल्यात धार्मिक कार्यक्र म करणे म्हणजे पुरातत्त्व खात्याच्या स्थळ अवशेष अधिनियम १९५८ च्या कलम १९ आणि ८ चे उल्लंघन असून हा दंडनीय अपराध असल्याचे पुरातत्त्व खात्याने म्हटले आहे. हा आदेश म्हणजे कणा नसलेला आदेश असल्याचे बोलले जाते.