शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

आशा सेविकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता थेट घरोघरी जाऊन कोरोना बाधितांचे सर्वेक्षण करणाऱ्या आशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता थेट घरोघरी जाऊन कोरोना बाधितांचे सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविका हक्काच्या मानधनापासून वंचित राहिल्या आहेत. त्यात शासनाने पुन्हा क्षयरूग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्याने आशा सेविकांनी रौद्ररूप धारण करत शुक्रवारी थेट जिल्हा परिषदेवर धडकल्या. वाढीव मानधनाबरोबर अन्य मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सर्वेक्षण करणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारत लवकर त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची धुरा आशा सेविका आणि गटप्रवर्तकांवर आहे. मात्र, त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जाताे. जो मोबदला मिळतो तोडका असल्यानेने तो जादा मिळावा. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सेविकांनी सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडली. मात्र, शासनाने कदर न करता त्रोटक मानधन दिले. आरोग्य केंद्रात मिळणारी वागणूक अपमान जनक असल्याने, तसेच सहनशिलतेचा अंत झाल्याने आशा सेविकांनी आपल्हा हक्कासाठी एल्गार पुकारत थेट जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वाढीव मानधन काढतांना ते सरसकट २ हजार ते ३ हजार रूपये द्यावे, गटप्रवर्तक व आशा सेविकांना अतिरिक्त बैठकांसाठी मानधन द्यावे, ते पूर्ण वर्षाचे काढावे, गटप्रवर्तकांना शारदाग्राम आणि एच.बी.एन.सी मानधन द्यावे या सारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारत लवकर मागन्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा स्वाती धअयगुडे, सरचिटणीस श्रीमंत घोडके, सीमा, मालुसरे आदी उपिस्थित होते.

---

तर सर्वेक्षण करणार नाही

आशा सेविकांना मिळणारी वागणूक चुकीची आहे. मानधन कमी असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या तुलनेत कामे जास्त असतात. यामुळे रोज १५० रूपये अनुदान मिळत असेल तरच आम्ही सर्वेक्षण करू, अन्यथा सर्व सर्वेक्षणातून माघार घेऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

कोट

जिल्ह्यातील आरोग्याची जबाबदारी आशा सेविकांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कोरोना काळात केलेले काम कौतूकास्पद आहे. त्यांच्या मागण्या या शासन दरबारी पाठवून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

''''-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

फोटो : विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करतांना आशा सेविका.