सांगवी : नीरा नदीकाठच्या परिसरातील आठ गावातील नदीच्या दूषित पाण्याचा तिढा कायमचा सोडवण्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. गेंड्याची कातडी अवतरून बसलेल्या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.
‘बंद करा, बंद करा दूषित पाणी बंद करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा’ अशा घोषणांनी परिसर आज पुरता हादरला. नदीच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले शेतकरी झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या वेळी आठ गावांतील हजारो शेतकºयांनी बारामती-फलटण रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी नदीच्या प्रदूषणाबाबत उपस्थितांनी अडचणी मांडत प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी नीरा नदीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.
सांगवी, कांबळेश्वर, शिरवली, खांडज, नीरावागज, मेखळी, सोनगाव (सांगवी फलटण) येथील ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या असंवेदनशील कारभारावर ताशेरे ओढले. शेतकरी आक्र मक झाल्याने प्रशासनाच्या उरात धडकी भरली आहे. नीरा नदीत बारामती तालुक्यासह फलटण नगरपरिषदेचे ओढ्यामार्फत सांडपाणी, कारखान्याचे केमिकलयुक्त सांडपाणी, कत्तलखाण्याचे दूषित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे एकेकाळात स्वच्छ, निर्मळ असणारी नीरानदी अस्वच्छ झाली आहे. दूषित पाण्यामुळे जनावरांसह लोकांच्या आरोग्य व शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. याबाबत फलटण दौºयावर निघालेले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनादेखील साकडे घातले आहे. पवार यांनी देखिल दूषित पाण्याची पाहणी करून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रशासनाला वारंवार कळवून नीरा नदीचे पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून सांगवीसह इतर गावांतीलग्रामस्थ झगडत आहेत. तोंडी, लेखी निवेदन देऊन याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तरीदेखील दूषित पाणी रोखू शकत नसल्याने प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. प्रशासनासह राजकीय मंडळीदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ जागे होणारका, असा सवाल शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे राहुल तावरे, किरण तावरे,राजेंद्र काळे, मदन देवकाते, शेतकरी संघटनेचे महेंद्र तावरे, विजय तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकुले, युवराज तावरे, सुहास पोंदकुले, अनिल सोरटे, नितीन आटोळे, भानुदास जगताप यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.नीरा नदीच्या पाण्याने अधिकाºयांना अंघोळ घालणार...दोन वर्षांपासून ग्रामस्थ नीरा नदीच्या दूषित पाण्यासाठी झगडत आले आहेत. मात्र, आता आठवडाभरात याची दखल घेतली गेली नाही तर पुणे येथील प्रदूषण विभागातील अधिकाºयांच्या कार्यालयात जाऊन नीरा नदीच्या दूषित पाण्याने अधिकाºयांना अंघोळ घालून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....मोठी किंमत मोजावी लागणार४अनेक दिवसांच्या लढाईनंतर आपल्या मागणीला कोणाकडूनही दाद मिळत नसल्याचे लक्षात येताक्षणी आपल्याकडे प्रशासनासह, राजकीय नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी नदीकाठच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तत्पूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनुसार नीरा नदीच्या प्रदूषणाचा तिढा सुटला तर बरा; अन्यथा राजकीय नेते मंडळींना याची फार मोठी किंमत मोजावी लागणार एवढं मात्र नक्कीच आहे.देव्हाºयातील देवदेखील आंदोलनात...आंदोलनादरम्यान माजी उपसभापती डॉ. अनिल सोरटे यांनी नीरा नदीच्या दूषित पाण्यामुळे शेजारील विंधन विहिरीतील पाण्यामुळे घरातील देव, महिलांच्या पायातील पट्ट्या, जोडवे धुतल्यामुळे काळे पडू लागले आहे. या पाण्याचा परिणाम देवावरही होऊ लागला असल्याने काळे पडलेले चांदीचे देव हात उंचावून आंदोलनात सर्वांना दाखविण्यात आले.