शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

पुण्यातील एलरो, युनिकॉर्न पबला पोलिसांनी ठोकले टाळे; मालकासह ४ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 10:31 AM

रात्री १.३० नंतर सुद्धा डीजे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्याने गुन्हे शाखेने केली कारवाई...

- किरण शिंदे

पुणे : पुणेपोलिसांनी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या एलोरो आणि युनिकॉन या नामांकित पबवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही पबमधील साऊंड सिस्टिम आणि इतर असे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. याशिवाय हॉटेलच्या मालकासह चार जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अमन शेख, संदीप सहस्रबुद्धे, रश्मी कुमार, सुमित चौधरी आणि प्रफुल गोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

रात्री १.३० नंतर सुद्धा डीजे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्याने गुन्हे शाखेने केली कारवाई. या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टिम, हुक्का पॉट यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही पब मधून पोलिसांनी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी शहरातील हॉटेल पब, बार यांना आस्थापना सुरू ठेवण्यासाठी रात्री १.३० पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत एलरो आणि युनिकॉर्न हाऊस हे दोन्ही पब रात्री १.३० नंतर सुद्धा सर्रास सुरू होते. भल्या मोठ्या डी जे साऊंड सिस्टिमने नागरिक हैराण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई केलीय. पुण्यातील हे दोन्ही नामांकित पब आता पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस