लाजर ऊर्फ सोहेल मुस्ताक शेख (वय २३), प्रदीप माधव आवारी (वय २७), गोरक्ष सुधाकर गायकवाड (वय ३०), आकाश बाळू उघडे (वय २०, सर्व रा. अकोले, ता. अकोले) यांचेवर गुन्हा दाखल अटक करण्यात आली आहे . फसवणुकीची फिर्याद अमीर दस्तगीर नदाफ (वय ३०, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिली आहे.
गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमीर दस्तगीर नदाफ यांना यातील आरोपी सोहेल शेख व त्याचेबरोबर असलेल्या दोन अनोळखी इसमांनी विश्वासात करून त्यांना नारायणगाव येथे बोलावून मासे असलेली पिकअप गाडी ही मुक्ताईदेवी यात्रा मैदान येथे लावण्यास सांगितले व नदाफ यांना जेवण करण्यासाठी नारायणगावमधून तीन ते चार किलोमीटर अंतरावर नेऊन हॉटेलमध्ये जेवणासाठी सोडून दिले. नंतर नदाफ यांच्याशी खोटे बोलून त्याचेकडे विश्वासाने ठेवलेले १ लाख २१ हजार ४५५ रुपये किमतीचे मासे व इतर मालमत्तेचा अपहार केला.
गुंड यांचे आदेशाने पोलीस हवालदार टाव्हरे, पोलीस शिपाई भेके, वाघमारे, पोलीस नाईक शेख यांच्या पथकाने आरोपी सोहेल शेख यास अकोले येथून अटक करून या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींची नावे स्पष्ट झाल्याने त्यानाही अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कार (MH 14, DN 6944) व मासे ठेवण्याचे २५ टप हे जप्त आले आहे. या आरोपींनी रत्नागिरी, सांगली, सातारा, अहमदनगर परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.