शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

Video: पुण्यात मध्यरात्री थरार! जोशी पुलाजवळ ५ प्रवाशांची कार वाहून गेली; बहीण भावाला बिलगली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 8:11 AM

Pune Car Drowned Video: पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे.

पुण्यात नदीपात्रात लावलेल्या कार पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाली की नेहमी पाण्यात वाहून जातात. हा भिडे पुलाकडील प्रकार असतो. परंतू, मध्यरात्री पुण्यातील एस एम जोशी पुलाजवळ थरारक घटना घडली. पालघरहून पुण्यात आलेले कुटुंबीय मध्यरात्रीनंतर या भागातून जात असताना त्यांची कार पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागली. या कारमध्ये लहान मुलासह पाच जण होते. या सर्वांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतू, भावा आणि बहीणीने एकमेकांसाठी दिलेली हाक अनेकांचे काळीज चिरणारी आहे. 

पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे. पोलिसांचा फोन खणाणला. एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती मिळाली. लागलीच एरऺडवणा पोलीस आणि आग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. 

रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून या जवानांनी कारमधील पाचही जणांना वाचविले. दिलासा देणारी बाब म्हणजे ही कार पाणी कमी असल्याने काही अंतरावर जाऊन थांबली होती. अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही कार पालघरची होती, ते रक्षाबंधन असल्याने पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टी कडून ते पात्रातील रस्त्याने जात होत. त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. एरऺडवणा, जनता वसाहत सेंट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि या मोठी दुर्घटना टळली. ड्रायव्हर ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस सऺदीप कार्ले यांनी मदत केली. 

मेरा भाई किधर है, उसके पास जाना है.... दीदी.... दोघेही बिलगले....पालघरमधील हे लालवाणी कुटुंबीय होते. आठ वर्षांचा मुलगा कृष्णा आणि त्याची मोठी बहीण वंचिका दोघेही एकमेकांना बिलगले. कृष्णाला जवानांनी आधीच पाण्याबाहेर आणले होते. तर वंचिका पाण्यातून बिथरलेली बाहेर आली आणि ती भावाला शोधू लागली. मेरा भाई किधर है, उसके पास जाना है म्हणत असताना तिला जवानांनी पोलिसांच्या खांद्यावर असलेल्या तिच्या भावाकडे नेऊन सोडले.... कृष्णादेखील दीदी दीदी करत तिला बिलगला. २.प्रिया लाल वाणी वय २२,३. कुणाल लाल वाणी वय २८४.कपिल लाल वाणी वय २१

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दल