शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यावर जोर

By admin | Published: December 02, 2014 6:03 AM

तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नियंत्रण आणलेली अनधिकृत बांधकामे विद्यमान आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात जोमात सुरू आहेत.

पिंपरी : तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नियंत्रण आणलेली अनधिकृत बांधकामे विद्यमान आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात जोमात सुरू आहेत. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि बीट निरीक्षकांवर यांच्यावर जबाबदारी निश्चित केली असताना, राजरोसपणे अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. दूर अंतरावर कोठे कोपऱ्यात अनधिकृत बांधकामे सुरू असतील, छुप्या पद्धतीने ती पूर्ण करण्याचे प्रयत्न होत असतील, तर बीट निरीक्षकांचे अशा बांधकामांकडे लक्ष जाणार नाही, परंतु महापालिकेच्या प्रशासकीय इमतारतीच्या जवळ होकच्या अंतरावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबतही अधिकारी, कर्मचारी डोळेझाक करू लागले आहेत. महापालिकेने दोन वर्षांच्या कालावधीत १५ लाख ४४ हजार ६९७ चौरस फुटांची ६८४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. ३१ मार्च २०१२ नंतर अनधिकृत बांधकामे होता कामा नयेत, असे धोरण अवंलंबले असताना, बांधकामे सुरूच राहिली. २००७ बांधकामधारकांवर गुन्हे दाखल झाले. नोटीस दिलेल्यांमध्ये मिळकतींमध्ये ५९ लाख १४ हजार ३१६ चौरस फुटांची बांधकामे आहेत.