शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:21 AM

व्यवस्थापनाशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडियाच्या करारपद्धतीवरील सुमारे १०० कर्मचा-यांनी लोहगाव विमानतळावरील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

पुणे : व्यवस्थापनाशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडियाच्या करारपद्धतीवरील सुमारे १०० कर्मचा-यांनी लोहगाव विमानतळावरील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र, या कर्मचाºयांनी प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक महत्त्वाची कामेही पार पाडली. त्यामुळे आंदोलनाचा फटका विमान उड्डाणांना बसला नाही.राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारी पुण्यात येत असल्याने त्याच्या आदल्या दिवशीच कर्मचाºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. आंदोलन केलेले कर्मचारी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने करार तत्त्वावर घेतले आहेत. चेकइन, बोर्डिंग पास, तिकीट तपासणी, बोर्डिंग उद्घोषणा व इतर कामे करतात. कंपनीच्या विमानतळावरील व्यवस्थापकाशी शनिवारी वाद झाला होता. त्यामुळे या व्यवस्थापकांना हटविण्याची मागणी कर्मचाºयांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली. कर्मचाºयांची कोल्हापूरला बदली करण्याची, करार रद्द करण्याची धमकी देतात. तसेच शुक्रवारी तीन महिलांसह एकूण सात जणांचा करार रद्द केल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. दरम्यान, आंदोलनामुळे एअर इंडियाच्या खिडकीसमोर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागला. सायंकाळी ज्येष्ठ अधिकाºयाने कर्मचाºयांची भेट घेऊन हा मुद्दा मंगळवारी सोडविण्याचे आश्वासन दिले. सोमवारी राष्ट्रपदी रामनाथ कोविंद पुण्यात येत असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.