शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
3
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
4
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
6
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
7
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
8
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
9
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
10
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
11
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
12
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
13
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
14
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
15
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
16
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
17
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
18
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
19
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश

कर्मचाऱ्यांना नाहीत निवासस्थाने

By admin | Published: July 09, 2015 11:13 PM

काम झाले नसल्याने उद्घाटन होऊन ११ महिने उलटले, तरी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची निवासस्थाने अद्याप मिळालेली नाहीत.

इंदापूर : विजेचे स्वतंत्र मीटर व पिण्याच्या पिण्यासाठी नळजोडणी करण्याचे केवळ आठवडाभरात होणारे काम झाले नसल्याने उद्घाटन होऊन ११ महिने उलटले, तरी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची निवासस्थाने अद्याप मिळालेली नाहीत. सध्या एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी १५ कुटुंबे पडझड झालेल्या जुन्या कर्मचारी वसाहतीत राहतात. उर्वरित ३२ कर्मचारी भाड्याने घरे घेऊन राहत आहेत. इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सन २०१४मध्ये तीन इमारतींमध्ये ३२ निवासस्थाने बांधून पूर्ण करण्यात आली. शुक्रवारी (दि. ८ आॅगस्ट २०१४) होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. इमारतीमधील वीजजोडणी, नळजोडणीची कामे त्या वेळी अपूर्ण होती. त्यामुळे उद्घाटन होऊनदेखील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तेथे राहण्यासाठी जाता आले नाही. ही स्थिती ११ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी आहे तशीच आहे.उपजिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४६ कर्मचारी आहेत. नळ व मीटर जोडणीची कामे त्वरित व्हावीत, असा कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या १३ जूनला आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली होती. त्यांनी १ जुलैपर्यंत थांबा, असे सांगितले होते. त्याला आठवडा उलटून गेला. मात्र, पुढे काहीही हालचाल झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. (वार्ताहर)जुन्या निवासस्थानांची ही दुरवस्था झाली आहे. खिडक्या-दारांची स्थिती दयनीय आहे. छप्पर गळत असल्याने घरात बसून पावसाचा ‘आनंद’ लुटता येतो. वरखाली ओलं होत असल्याने, कुठेही न जाता बर्फाळ प्रदेशातील रहिवासाचा अनुभव घेता येतो, असे तेथील कर्मचाऱ्यांनी अत्यंत खेदाने सांगितले.