पुणे : शासनाच्या आदेशानुसार शहरात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली असून, या टप्प्यात लसीकरणासाठी शहरातील सुमारे ६२ हजार ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांनी नोंदणी केली आहे़ यापैकी ज्यांना लागलीच लस घ्यावयाची आहे व ज्यांचे नाव नोंदविले आहे़ असे सेवक ‘को-विन अॅप’व्दारे लसीकरणासाठी येणाऱ्या ‘एसएमएस’ची वाट न पाहता स्वत:हून जाऊन लस घेऊ शकतील़ अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिली़
शासनाच्या आदेशानुसार, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५६ हजार आरोग्य सेवकांनी नोंद केली होती़ यापैकी साधरणत: २४ हजार आरोग्यसेवकांनी लस आत्तापर्यंत घेतली आहे़ अनेक आरोग्य सेवकांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याने, पहिल्या टप्प्यात आजपर्यंत ४३ टक्केच लसीकरण झाले आहे़ यामुळे दुसऱ्या टप्प्यात ज्या सेवकांनी नोंदणी केली आहे व ज्यांना लसीकरणासाठी ‘एसएमएस’आला नाही असे सेवक स्वत:हून जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात़ परंतु, यासाठी त्यांचे नाव लसीकरणासाठीच्या संगणकीय यादीमध्ये असणे आवश्यक आहे़ या संगणकीय प्रणालीत नोंद करूनच त्यांना लस देण्यात येणार असून, लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे डॉ़ भारती यांनी सांगितले़
शहरात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुस-या टप्प्यास सुरुवात झाली आहे़ यामध्ये ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणजेच कोरोना काळात काम करणाऱ्या पालिका, शासन, पीएमपीएमएल, शासकीय कार्यालयांमधील चालक, कंत्राटी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी शासकीय सेवकांना लस दिली जाणार आहे. तसेच पोलिसांनाही या दुसºया टप्प्यात लस देण्यात येणार असून, शुक्रवारपर्यंत सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे़
--------------------------------------------