नसरापूर : कात्रज बोगद्यापासून सारोळापर्यंत पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेले अतिक्रमण पुणे-सातारा टोल रोड प्रा. लि. ने राजगड पोलिसांच्या साहाय्याने अतिक्रमण कारवाई करून आज काढले. पुणे-सातारा महामार्गाजवळील सर्व ७५ ते ८० अनधिकृत स्टॉल तर ९० ते ९५ अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले असल्याचे पुणे-सातारा टोल रोड प्रा.लिच्या वतीने माहिती देण्यात आली.
गेले अनेक दिवस महामार्गावर अनधिकृत स्टॉल, अनाधिकृत जाहिरात बोर्ड, व्यावसायिक यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना जीव मुठीत धरावा लागत होता. अतिक्रमण कारवाई झाल्याने महामार्गाचा श्वास मोकळा झाल्याचे जाणवत आहे. पुणे-सातारा टोल रोड प्रा.ली यांचेवतीने राजगड पोलीस आणि वाहतूक पोलिस, नँशनल हायवे पेट्रोलिंग कर्मचारी तसेच टोल कर्मचारी, अमित भाटिया, व्यवस्थापक बद्रिप्रसाद शर्मा, अभिजित गायकवाड, आकाश चोरगे आदींनी पुणे सातारा महामार्गावर सारोळा ते कात्रज नवीन बोगद्यादरम्यान ही अतिक्रमण कारवाई केली.
सोबत फोटो व ओळ : पुणे - सातारा महामार्गावर सारोळा ते कात्रज नवीन बोगदा दरम्यान ही अतिक्रमण कारवाई करण्यात केली.
030921\img-20210903-wa0046__01.jpg
सोबत फोटो व ओळ : पुणे - सातारा महामार्गावर सारोळा ते कात्रज नवीन बोगदा दरम्यान ही अतिक्रमण कारवाई करण्यात केली.