पुणो : शहराच्या चारही बाजूला डोंगररांगा असून, त्या ठिकाणांहून नैसर्गिक ओढे, नाले वाहत नदीपात्रत येतात. परंतु, काही वर्षात पालिकेच्या दुर्लक्षाने प्रामुख्याने खराडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, वारजे या ठिकाणी वाहणा:या नैसर्गिक नाले-ओढय़ांना अतिक्रमणाने विळखा घातला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका होऊन सोसायटीत पाणी घुसण्याचा धोका आहे.
1991ला शहरात आयटी व बीटीचा विकास झपाटय़ाने झाला. रोजगार वाढल्यामुळे 2क् वर्षात शहराची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे घर व सदनिकांची मागणी वाढत गेली. त्यामुळे कोथरूड , वडगावशेरी, खराडी, हडपसर, कात्रज, वारजे या भागात अतिक्रमणो व अनधिकृत बांधकामे फोफावत गेली.
पालिका हद्दीत सदनिका मागणीच्या तुलनेत नवीन बांधकामे व गृहप्रकल्पासाठी जागांच्या मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे उपनगरातील ओढे व नाल्यामध्ये भराव टाकून अतिक्रमणो सुरू झाली. हे करताना निर्माण होणारा राडारोडा नदीपात्रत टाकण्यात आला. मात्र, पालिका प्रशासनाच्या क्षेत्रीय कार्यालय व निरीक्षक पथकाने कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
बडय़ा गृहप्रकल्पासाठी नैसर्गिक नाले सिमेंटने चॅनलायजींग करून वळविण्यासाठी पालिका बांधकाम विभागाने अनेक ठिकाणी परवानगी दिली आहे. त्यामुळे चार वर्षापूर्वी चिंचोळ्या नाल्यातील पाणी कोथरूडमधील सोसायटय़ांमध्ये घुसून नागरिक वाहून गेले होते. त्या वेळी नैसर्गिक नाल्यातील अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी उघडली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतरही ही मोहीम गुंडाळण्यात आली.
दरम्यान, ओढे व नाल्यांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली पालिका प्रशासनाने काही प्रकल्पांना मंजुरी दिली. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. मात्र, काही नागरिकांनी न्यालायलात दाद मागितल्यानंतर नाल्यातील अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. पालिका प्रशासनाने प्रायमोव्ह संस्थेच्या अहवालानुसार, ओढे- नाल्यातील अतिक्रमण थांबवून नैसर्गिक प्रवाह पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, नाहक बळी जाण्याची भीती नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)
28 नैसर्गिक नाले वळविले..
गेल्या काही वर्षात शहरातील पूररेषेबरोबरच नैसर्गिक ओढे व नाल्यामध्ये अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकामाचे प्रमाण वाढले आहे. साधारणत: हडपसर, मुंढवा, खराडी, वडगावशेरी या पूर्व भागातील उपनगरात सर्वाधिक 28 नैसर्गिक नाले वळविण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाने माहिती अधिकारातून नुकतीच दिली आहे.
बीडीपीमध्ये अनधिकृत बांधकामे..
स्वच्छ व हरित पुणो कायम ठेवण्यासाठी महापालिकेत समाविष्ट 23 गावांत जैववैविध उद्यान (बीडीपी) आरक्षण चारही बाजूंच्या डोंगर उतारावर टाकण्यात आले होते. परंतु, गेल्या काही वर्षात बीडीपीची जागा ताब्यात घेण्याची महापालिका पदाधिकारी व प्रशासनाची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे बीडीपीचे आरक्षण असलेले डोंगर-टेकडय़ा पोखरून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.
नदीपात्रतील राडारोडय़ाकडे दुर्लक्ष..
4शहराच्या मध्यवर्ती भागातून मुळा व मुठा नदी वाहते. परंतु, महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी नदीपात्रच्या बाजूला भराव टाकण्यात आले आहेत. त्या ठिकाणी बांधकाम विकसकांनी गृहप्रकल्प व महापालिकेने रस्त्याची कामे केली. त्या वेळी काही पर्यावरण संघटनांनी हरित लवादाकडे दाद मागितली. त्यानंतर अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यानंतरही काही बांधकाम व्यावसायिक नदीपात्रत राडारोडा टाकून भराव निर्माण करीत असताना महापालिका प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणो आहे.