शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

महामेट्रोचे फुटपाथवर अतिक्रमण, पादचाऱ्यांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 2:18 AM

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महापालिकेच्या वतीने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी रस्त्यांची रुंदी कमी करून प्रशस्त फुटपाथ तयार करण्याचे काम सुरू आहे

पुणे : गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महापालिकेच्या वतीने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी रस्त्यांची रुंदी कमी करून प्रशस्त फुटपाथ तयार करण्याचे काम सुरू आहे; परंतु सध्या शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांसाठी महामेट्रो कंपनीने जागोजागी फुटपाथवरच अतिक्रमण केले असून, फुटपाथची रुंदी कमी केली आहे. यामुळे मात्र सध्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून चालण्यास भाग पडत आहे.महामेट्रोकडून शहरात पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरूआहे. या मेट्रो कॉरिडॉरमध्ये कर्वे रोड, शिवाजीनगर, आरटीओ रोड परिसरात महामेट्रोकडून फुटपाथची रुंदी कमी करण्यात आली असून त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामामुळे एकीकडे पुणेकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे मेट्रोच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचे फुटपाथवरून चालणे देखील कठीण झाले आहे. कर्वे रोड परिसरात मेट्रो फुटपाथवर काही ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात आले आहे. मेट्रोचे बांधकाम साहित्य नित्यनियमाने फुटपाथवर टाकण्यात येत आहे. पौड रोड येथे तर महामेट्रोने आपले कार्यालयच फुटपाथवर थाटले आहे.महामेट्रो आणि महापालिका सयुक्तरीत्या नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मिळावे यासाठी नियोजन करीत आहे. ज्या ठिकाणी फुटपाथ नाही, त्याठिकाणी महामेट्रोकडून फुटपाथची निर्मिती करण्यात येत आहे. ज्याठिकाणी फुटपाथ फुटलेले आहेत, त्यांची दुरुस्ती महामेट्रोकडून करण्यात येत असल्याचे रिच २ चे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो