नारायणगाव : नारायणगाव बसस्थानकालगत असलेले ६१ गाळे हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत असल्याचे निश्चित झाले असून, हे सर्व गाळे अतिक्रमणात आहे, हे स्पष्ट झाले आहे़ आज (दि़ २५) भूमिअभिलेख विभागाचे मोजणी अधिकाऱ्यांनी हद्द कायम करून सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वांच्या उपस्थितीत पिवळे पट्टे मारून व खांब रोवून त्यांची हद्द निश्चित करून दिली. दरम्यान, या निर्णयाने नारायणगाव ग्रामपंचायतीला मोठा दणका बसला आहे़ ग्रामपंचायतीने दि़ १६ नोव्हेंबर रोजी शंकर व बाळू जाधव यांच्या गाळ्यातील साहित्याची जप्ती करून या गाळ्याची मालकी असल्याचे सांगितले होते़ परंतु मोजणीमध्ये हे गाळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मोठा फटका ग्रामपंचायतीसाठी मानला जातो़ या गाळ्यांवर सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, मोजणीझाल्यानंतर हे गाळे अतिक्रमणातच आहेत, अशी बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती़ ‘लोकमत’चे हे वृत्त खरे ठरलेले आहे़सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नारायणगाव-जुन्नर-मढ राज्य महामार्ग क्ऱ १११ वरील नारायणगाव एसटी बसस्थानकाच्या बाजूला असणाऱ्या जुन्नर रस्त्यात साधारण ८०० मी़ रस्त्याची अति तातडीची मोजणी भूमिअभिलेख विभागाकडे ५७ हजार रुपये मोजणी फी भरून दि़ २२ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आली होती़ (वार्ताहर)
नारायणगावचे गाळे अतिक्रमणातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 1:43 AM