--
खोर : खोर (ता. दौंड) येथे जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून सन २००७ मध्ये दलितवस्तीसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यानुसार खोर गावठाण ओढ्यालागतची जागा बक्षीसपत्र करून त्या ठिकाणी सात परस विहीर खोदण्यात आल्या.
तेथून खोदकाम केलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून दलितवस्तीसाठी पाणी नेण्यात आले.
मात्र, आज विहिरीत जवळपास कित्येक वर्षांपासून खासगी लोकांनी या विहिरीत अतिक्रमण केले असून यामध्ये विहिरीत मोटारी टाकून पाणी घरी नेत आहेत. ही योजना दलितवस्तीसाठी मंजूर केली असून त्याच्या लाभार्थ्यांकडून पाणीपट्टी वसूल केली जात आहे, असे असताना काही कुटुंबीय मात्र विहिरीवर हक्क सांगत विहिरीतील पाण्याचा गैरवापर करत असल्याचे चित्र आहे.
याबाबत माहिती देताना प्रा. डॉ. अशोक शिंदे म्हणाले की, मी सन २००५-२०१० पर्यंत खोर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होतो, त्या वेळी मी स्वतः कै. रामकृष्ण शंकर शिंदे यांच्या मालकीची जागा ही बक्षीसपत्र करून विहीर बांधकाम करण्यास परवानगी मिळवून दिली आहे. तरीदेखील खासगी सावकारीच्या माध्यमातून जर कोणी विहिरीमध्ये अतिक्रमण करीत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. त्यावेळी रामकृष्ण शिंदे यांनी ही जागा दिली होती त्यानुसार पाणी वापरण्याचा अधिकारी फक्त रामकृष्ण शिंदे यांनाच दिला होता. परंतु आज हे केलेले अतिक्रमण खपवून घेतले जाणार नसून संबंधित अतिक्रमण केलेल्या ग्रामस्थांनी त्वरित ह्या मोटारी काढून घ्याव्यात. याबाबत माजी सरपंच सुभाष चौधरी म्हणाले की, गेल्या पंचवार्षिक योजनेत मी सरपंच असताना याठिकाणी अतिक्रमण केलेल्या मोटारी काढून घेण्याच्या संदर्भात ग्रामसेवक यांच्यामार्फत आदेश दिले होते. त्यानंतर त्या मोटारी काढण्यात आल्या. परत जर मोटारी टाकल्या तर ग्रामपंचायतला त्या मोटारी जप्त करण्याचे आदेश दिले होते.परंतु आज त्या सार्वजनिक विहिरीत पुन्हा मोटारी टाकून पाणी उपसा केला जात असून यास सर्वस्वी जबाबदार ही खोर ग्रामपंचायत आहे. त्यांनी न काढल्यास त्यांच्या मोटारी ग्रामंपचायतीकडून जप्त केल्या जातील.
एम. जी. पाडुळे,
ग्रामविकास अधिकारी
--
चौकट :
खोर ग्रामपंचायतीच्या मनमानी, भोंगळ कारभारामुळे ह्या खासगी अतिक्रमण हटविले जात नाही हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांनी या अतिक्रमण केलेल्या पाण्याच्या दुरउपयोग थांबवावा. सध्या दुष्काळी परिस्थिती असून असे अतिक्रमण करणे योग्य नाही. यामध्ये जिल्हा परिषद व दौंड पंचायत समितीने यांनी जातीने लक्ष घालून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
- प्रा.डॉ अशोक शिंदे
एम जी पाडुळे,--
फोटोओळ : खोर (ता.दौंड) येथील हीच ती दलितवस्ती पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर यामध्ये खासगी मालकीने अतिक्रमण केले आहे.