शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

सातारा रस्त्यावर अतिक्रमण हटविले

By admin | Published: June 02, 2017 2:39 AM

पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज डेअरीच्या बाजूला कामठे गॅरेजसमोरील अतिक्रमण, पथ विभाग, मालमत्ता भूमी जिंदगी विभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज डेअरीच्या बाजूला कामठे गॅरेजसमोरील अतिक्रमण, पथ विभाग, मालमत्ता भूमी जिंदगी विभाग यांनी सयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.पुणे-सातारा महामार्गावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासमोर ‘स्वारगेट ते कात्रज’ या रस्त्यावरील बीआरटी, सायकल ट्रॅक, पदपथ व रस्तारुंदीकरण काम सुरू आहे. या वेळी पथ विभागाचे उप अभियंता अर्धापुरे, राहुल सोरटे, बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता डी. एन. जगताप, भूमी जिंदगीचे रमेश कांबळे आदींसह पालिका अधिकारी या वेळी उपस्थित होते. सुमारे १२०१ चौ. मी. अतिक्रमण मोकळे करण्यात आले आहे; तसेच पुढील १८०० चौ. मी. जागेसंदर्भात विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कारवाई केली नाही, असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.ज्या जागेवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्या जागेचे मालक हनुमंत कामठे व रमेश कदम यांनी सांगितले की, ही जागा अजून आम्ही पालिकेला सुपूर्द केलेली नाही. याचा विषय न्यायालयात चालू असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे.२४ एप्रिल रोजी कात्रजच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. त्यापैकी कामठे गॅरेजच्या समोरील जागा हस्तांतरण करून रस्तारुंदीकरण करावे, ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे केली होती. या समस्येबाबत पालिका पथ विभाग, भूमी जिंदगी या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा घडून आणला. आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाईचे आदेश दिल्यामुळे रस्तारुंदीकरणाचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या कात्रजकरांना न्याय मिळाल्याचे समाधान वाटते.- अमृता बाबर, नगरसेविका‘स्वारगेट ते कात्रज’ या रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून मनपा अधिकारी व जागामालक यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी बैठक घेतल्या आहेत; तसेच हा विषय २० मेच्या सर्वसाधारण सभेत घेतला होता. १९९६ मध्ये ताब्यात आलेल्या जागा ताब्यात घेण्यास उशीर केला. हा विषय शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या रस्त्याचा आहे. त्यामुळे सामोपचाराने मिटवण्याची आवश्यकता आहे.- वसंत मोरे, नगरसेवकपुणे शहर व कात्रज उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून, तो पूर्णपणे विकसित व्हावा, यासाठी संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केला आहे. पालिका अधिकारी व जागामालक यांनी एकत्र बसून विषय मार्गी लावावा. जागामालकाच्या उर्वरित जागेच्या विकसनासाठी सहकार्य करू, त्यामुळे मात्र जागामालकांनी नागरिकांचे हित लक्षात घेता, न्यायालयाचा आधार घेऊन विकासाच्या आड येऊ नये.- युवराज बेलदरे, नगरसेवक